आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी विशेषः या दिवशी या ठिकाणी का जमतात शेकडो विषारी साप, जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- जंगलात साप असणे तशी सामान्य बाब आहे. पण मध्य प्रदेशच्या राजधानीजवळ असलेल्या बुधनी जंगलात एका ठिकाणी शेकडो विषारी साप फणा काढून झाडावर निवांत बसले दिसतात. यावेळी या झाडाजवळून जाणाऱ्या लोकांना निश्चितच भय वाटेल. यातील अनेक साप एवढे विषारी आहेत की त्यांनी दंश केला तर रुग्णालयात जाण्यापूर्वीच व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल.
तुम्ही विचार करीत असाल की या झाडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात साप का जमले. प्रत्येक वर्षी नागपंचमीनंतर सर्पमित्र सलीम त्यांच्या टीमसह या जंगलात येतात. शहरांमध्ये पकडेले साप सोडतात. गेल्या तीस वर्षांपासून ते येथे साप सोडत आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे दीड लाख साप सोडले आहेत. यातील काही साप मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि राजभवन येथून पकडले आहेत.
या सापांमध्ये घोडा पछाड आणि पाणीदार सापांचाही समावेश आहे. पावसाळ्यात भोपाळमध्ये अनेक साप दिसून येतात. त्यांना पकडण्यासाठी सलीम यांना हमखास बोलविले जाते. आता सलीम यांची एक टीम तयार झाली आहे. फोन केला की ही टीम लगेच येथे जमते. साप पकडल्यावर सलीम यांच्या घरी ठेवले जातात. त्यांना खाद्य दिले जाते. जेव्हा त्यांची संख्या जास्त होते, तेव्हा त्यांना जंगलात सोडले जाते.
व्हिडिओ- मनीष पटेरिया
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे आणखी काही फोटो... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...