आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ankita Joshi About Film Director Vidhu Vinod Copada Story In Marrathi

जिद्द बाळगली नसती तर बँकेत क्लार्क राहिलो असतो : चोप्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- चित्रपट निर्माते विधू विनाेद चोप्रा यांनी आयुष्यात काही करण्याची अस्वस्थता आणि ते मिळवण्याची िजद्द नसती तर मी बँकेत क्लार्क राहिलो असतो, असे म्हटले आहे. २७ वर्षांपूर्वी ठरवले होते की एखाद्या दिवशी "वजीर'च्या कथेवर चित्रपट बनवणार. तेव्हापासून त्या स्वप्नासोबत ते पूर्ण करण्यासाठीच मी जगत होतो, असे ते म्हणाले.
'दिव्य मराठी नेटवर्क'शी विशेष बातचीत करताना चोप्रा यांनी आपल्या आगामी "वजीर' चित्रपटातील अनेक गोष्टी प्रथमच सांगितल्या. अमिताभ बच्चन फरहान अख्तर अभिनीत हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. चोप्रा म्हणाले की, या दैनिकाची फिलॉसॉफी "जिद्द बाळगा, जग जिंका' असे आहे, तेव्हा मला वाटले की, माझीदेखील जवळपास तशीच जिद्द आहे.
चोप्रा म्हणाले की, "माझ्या वडिलांना मी डॉक्टर व्हावे, असे वाटत होते. मी कायम चांगल्या मार्कांनी पास होत असे; परंतु चित्रपट बनवणार हीच माझी जिद्द होती. वडिलांना मी त्याबाबत सांगत असे तेव्हा मार मिळत असे. त्यामुळे परीक्षेत मी निम्मेच प्रश्न सोडवत असे. जेणेकरून कमी मार्क मिळावेत डॉक्टर व्हावे लागू नये. त्यांची तर इथवर तयारी इच्छा होती की कमी गुण मिळाले तर मी बँकेत क्लार्क व्हावे; परंतु मी माझ्या स्वप्नांसह जगत होतो. माझे स्वप्न मी जवळपास २७ वर्षे डोळ्याआड जाऊ दिले नाही. जेव्हा माझी डॉक्युमेंट्री "अॅन एन्काउंटर विथ फेसेस' ऑस्करसाठी निवडली गेली तेव्हा मी वडिलांना जाऊन सत्य सांगितले. मला वाटले की, ते आता मला रागावणार नाहीत; परंतु त्यांनी तेव्हा मला जोरदार चापट लगावली.'
बुद्धिबळाच्या पटावर बनवलेल्या या नव्या चित्रपटाचा विषय यशाच्या धड्याबाबत विधू विनोद म्हणतात की, "मी यशाच्या मागे धावत असतो. माझ्यात गुणवत्ता ओळखण्याची गुणवान लोकांसाठीचे वेड आहे. मला वाटते की, पात्र लोकांवर विश्वास ठेवला तर मग कोणत्याही यशाच्या मागे धावण्याची गरज पडणार नाही. माझ्या चित्रपटातील कलाकार तो बनवणाऱ्यांमध्ये तसेच वेड आहे. याच वेडातून अफलातून कल्पना सुचतात त्या साकार होतात. ४०० वर्षांपूर्वी शेक्सपियरने हॅम्लेट लिहिले होते आणि आज असा एकही दिवस जात नाही त्या दिवशी या नाटकावर जगात कुठेच काही झाले नाही. अद्भुत अनोख्या कल्पना अशाच असतात. मुन्नाभाईच्या निर्मितीच्या वेळी लोकांनी मला म्हटले होते की, असा विनोदी चित्रपट चालणार नाही; परंतु मी तो बनवला. कारण मला तो बनवायचा होता. हा सगळा अनुभूतीचा खेळ आहे. तुम्ही मतदान चाचणी घेऊन कुठला िचत्रपट तयार करू शकत नाही; परंतु "वजीर'सारखे स्वप्न अमिताभ, फरहान, अभिजित जोशी बिजॉय नांबियारसारख्या लोकांशिवाय ते पूर्ण केले जाऊ शकले नसते.