आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंत्याकडे अडीच कोटींचे घबाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - नर्मदा खोरे विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रल्हाद पटेल यांच्या घरावर लोकायुक्त पथकाच्या धाडीत 57.6 लाखांच्या रोकडसह अडीच कोटींपेक्षा अधिक संपत्ती उघड झाली.
लोकायुक्त एसपी सिद्धार्थ चौधरी यांच्याकडे गोपनीय तक्रार आली होती. मंगळवारी पहाटे सहा वाजता त्यांनी पथकासह बंगल्यावर धाड घातली. स्वयंपाकघर, बेडरूम, मंदिरामागे व गाद्यांखाली नोटांची बंडले आढळून आली. याशिवाय अर्धा किलो सोन्याचे दागिने, 4.5 किलो चांदी, कार व तीन दुचाकी जप्त केल्या. त्यांच्या नावावर रायसेन जिल्ह्यातील बरेलीमध्ये 13 एकर शेतजमीन, 12 नंबर स्टॉपवर एक दुकान, सव्वा कोटींचा बंगला व 20 बँक खाती असल्याचेही आढळले.