आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्कराच्या जवानाची आत्महत्या, लग्नाच्या दिवशीच अंत्यसंस्कार, वाचा धक्कादायक कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/दमोह/सागर (मध्य प्रदेश)- याला दुर्भाग्य म्हणतात, की लष्कराच्या जवानावर लग्नाच्या नियोजित दिवशीच अंत्यसंस्कार करण्यात आले. 23 नोव्हेंबर रोजी त्याचे लग्न होणार होते. पण त्याचा मृतदेह याच दिवशी घरी आला. त्यानंतर अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. त्याचे झाले असे, की त्याने लग्नासाठी सुटी मागितली होती. पण सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या तणावामुळे सुट्या मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे निराश होत त्याने आत्महत्या केली.
लग्नाचा आनंद मावळला, घरी पसरले दुःख
प्रितम चौरसीया असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. पंजाबच्या पाठाणकोटमध्ये त्याने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह घेऊन नातलग काल हिंडोरिया या जन्मगावी आले. याच गावी त्याचे लग्न होणार होते. लग्नाची तयारी झाली होती. लग्नाच्या दिवशीच गावात त्याचा मृतदेह आला. त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला आजुबाजुच्या गावातील लोकही गोळा झाले होते. वधू पक्षाचे लोकही अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही
प्रितमचा भाऊ मुकेश याने सांगितले, की आम्हाला आत्महत्येचे ठिकाण दाखवण्यात आले नाही. सुसाईड नोटबाबतही काही सांगितले नाही. मृतदेह सरळ अमृतसर येथून दिल्ली आणि नंतर इंदूरला फ्लाईटने पाठवण्यात आला. आतापर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही. काही विचारले तर कुणीही काही सांगत नाही. त्याने आत्महत्या कशी केली याचीही माहिती देण्यात आली नाही.
बातमी कळल्यावर बसला धक्का
20 नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांना प्रितमने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. यावेळी घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती. सुट्या घेऊन तो येईल आणि धुमधडाक्यात लग्न होईल असे कुटुंबीयांनी गृहित धरले होते. त्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी वधू पक्षासाठी प्रीतिभोज ठेवण्यात आले होते. त्यासाठी दुपारी जेवण तयार करण्यात येत होते. या दरम्यान घरी लष्कराच्या मुख्यालयातून फोन आला. प्रितमने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. तोपर्यंत सर्वांना लग्नाचे कार्डही वाटण्यात आले होते. लग्नासाठी नातलग घरी येण्यास सुरवात झाली होती. जुनमध्ये त्याच्या साखरपुडा किर्तीसोबत करण्यात आला होता.
पुढील स्लाईडवर बघा, किर्तीसोबत झालेल्या साखरपुड्याचे फोटो.... प्रितमची सुसाईड नोट.... असा देण्यात आला अग्नी....
बातम्या आणखी आहेत...