आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army Jawan Misbehave With Woman In Rajdhani Express

राजधानी एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशाला जवान झिंगत म्हणाला, \'तुला स्पर्श करु\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मला तुला स्पर्श करायचे आहे, असे दारु घेऊन झिंगत असलेल्या एका जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करीत असलेल्या महिलेला म्हटल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. ही महिला बालकाला घेऊन एकटीने प्रवास करीत होती. लष्कराचा जवान प्रचंड दारु घेऊन होता.
त्यानंतर महिलेने लष्कराच्या जवानाच्या वर्तनावर आक्षेप घेतला. त्यावेळी तो जवान महिलेच्या शेजारी बसला. तिच्यासोबत अश्लिल चाळे करु लागला. या महिलेजवळ स्मार्टफोन होता. तिने जवानाचा एक फोटो काढला. जीआरपी हेल्पलाईनच्या अॅपवर अपलोड केला. सोबत आपली तक्रार नोंदवली.
त्यानंतर जीआरपीच्या टीमने लगेच महिलेशी संपर्क साधला. फोनवर बोलत असलेले जीआरपी अधिकारी दुष्यंत जोशी म्हणाले, की तुम्ही काळजी करु नका. आम्ही तुम्हाला मदत करु.
राजधानी एक्स्प्रेस भोपाळला आल्यावर पोलिसांचे पथक ट्रेनमध्ये दाखल झाले. त्यांनी जवानाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली. संबंधित महिलेची वैद्यकीय चाचणी लगेच करण्यात आली. जवान प्रचंड दारु घेऊन होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. या जवानाचे नाव लान्स नायक कमलेश असे आहे.