आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी जवानांना दारू पिताना पकडले, संतप्त सैनिकांचा पोलिस स्टेशनवर हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस स्टेशनमध्ये केलेली नासधूस - Divya Marathi
पोलिस स्टेशनमध्ये केलेली नासधूस
इंदूर (मध्यप्रदेश) - महु छावणीतील भारतीय लष्कराच्या सैनिकांनी गुरुवारी सकाळी विजयनगर पोलिस स्टेशनवर हल्ला केला. जवानांनी पोलिस स्टेशनमधील साहित्याची तोडफोड केली त्यासोबतच पोलिसांची धुलाई केली. जातांना त्यांनी पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरा देखील तोडून सोबत नेला. बुधवारी रात्री त्यांच्या एका सहकाऱ्याला विजयनगर पोलिसांनी दारु पिताना पकडले आणि मारझोड केली होती. त्यामुळे चिडलेल्या जवानांनी हल्ला केला. पोलिस आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे.
काय आहे प्रकरण
बुधवारी रात्री विजयनगरमधील एका मॉल बाहेर दारू पित होते. यावेळी पेट्रोलिंगवर असलेल्या विजयनगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्यातील एकाला मारहाण केली. नंतर जेव्हा त्यांना समजले हे सैन्याचे जवान आहेत तेव्हा त्यांना सोडून देण्यात आले. या दोन्ही जवानांनी महु छावणीत जाऊन घडला प्रकार सहकार्यांना सांगितला.
पहाटे पाच वाजता पोलिस स्टेशनवर हल्ला
गुरुवारी पहाटे साधारण पाच वाजता 100 जवानांनी विजयनगर पोलिस स्टेशनवर हल्ला केला. त्यांनी पोलिस स्टेशनची मोठी नासधूस केली आणि तिथे हजर असलेल्या पोलिसांना बेदम झोडपले. जाता जाता जवानांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि रेकॉर्डर यांचीही नासधूस केली. यावेळी पोलिसांची वाहने, वायरलेस सेट्स, कॉम्प्यूटर आणि प्रिंटर यांची मोडतोड करण्यात आली. मारहाणीत 10 पोलिस जखमी झाले. यावेळी पोलिस स्टेशन बाहेर असलेल्या काही सामान्य नागरिकांनाही सैनिकांच्या रोषाचा समाना करावा लागला.
गुन्हा दाखल करणार
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत लष्कराचे जवान निघून गेले होते. लष्कराच्या जवानांकडून पोलिस स्टेशनवर हा काही पहिला हल्ला नाही. याआधीही अशा घटना समोर आल्या आहेत. डीआयजी संतोष कुमार यांनी गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबतही यासंबंधी चर्चा केली जाणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जवानांनी कशी केली तोडफोड