आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: धावत्या ट्रेनमध्‍ये युवकांचा हैदोस, महिला-तरुणींसमोर काढले कपडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/ग्वालियर - सेना भरतीवरून परत जात असलेल्‍या काही टारगट तरुणांनी सोमवारी चंबल एक्‍स्‍प्रेसमध्‍ये सह प्रवाशांना प्रचंड त्रास देत तरुणी आणि महिलांची छेड काढली. एवढेच नाही तर महिलांच्‍या समोर स्‍वत:चे कपडे उतरवून अश्लिल हावभाव केले. मात्र, या प्रकरणी जीआरपी जवानांनी केवळ बघ्‍यांची भूमिका घेतली. घटनेनंतर डीआरएम, रेल्‍वे पोलिस आणि सेना दलाने एकमेकांवर जबाबदारी जोपवून हात वर केले. त्‍यामुळे रेल्‍वेतील प्रवाशांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्‍हा ऐरणीवर आला. शिवाय केवळ ट्वीटवरील हेल्‍पलाइन फक्‍त चहा, कॉफीपुरतीच मर्यादित आहे का, असा प्रश्‍नही उपस्‍थ‍ित झाला आहे.

तरुणांनी घातला सहा तास हैदोस.... जागोजागी चैन पुलिंग
- आर्मीने छतरपूर येथे भरती ठेवली होती. सोमवारी दुपारी 2.45 वाजता चंबल एक्‍स्‍प्रेस हरपालपूरमध्‍ये पोहोचली. या ठिकाणी दतिया, मुरैना, श्योपूरसाठी काही तरुण ट्रेनमध्‍ये चढले.
- त्‍यांनी स्लीपर कोचवर ताबा मिळवला. जागोजागी चैन पुलिंग केले. खिडक्‍यांचे तावदान तोडले. सिट फाडले. लाइट फोडले. रात्री 9 पर्यंत त्‍यांचा हैदोस सुरूच होता.
- सह प्रवाशांनी त्‍यांचा विरोध करण्‍याचा प्रयत्‍न केला तर महिला आणि तरुणींपुढे स्‍वत:चे कपडे काढून अश्लिल हावभाव केले.
- त्‍यामुळे महिला घाबरल्‍या. तरुण मुलींनी डोळे बंद करून चेहरा झाकून घेतला.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, महिला म्‍हणाल्‍या आमच्‍या पुढे ते निवस्‍त्र झाले... शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO ...