आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशंट बनून डॉक्टरांकडे आली होती तरुणी, नंतर सुरु झाला हायप्रोफाइल ब्लॅकमेलिंगचा खेळ!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर- मध्य प्रदेशातील जबलपूर येथील हायप्रोफाइल ब्लॅकमेलिंग केसचा नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. लिव्ह-इनमध्ये राहून पार्टनर नताशाला तुरुंगात पाठवणारा डॉ.सचिन लूथरा अडचणीत सापडला आहे.

सचिनने नताशावर ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप केला होता आणि स्वत: तांदळासारखा स्वच्छ असल्याचा बनाव पोलिसांसमोर केला होता. दरम्यान, नताशाने पोलिसांना कलम 161 नुसार दिलेल्या जबाबात सांगितले की, डॉ. लूथरा याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. इतकेच नाही तर शारीरिक संबंध प्रस्थापित करून जबरदस्तीने तिचा गर्भपातही करवून घेतला होता.

डॉ.लूथरा विरोधात नताशाने केला हा खुलासा...
- नताशाचे वकील अभय सिंह ठाकूर यांनी सांगितले की, डॉ.लूथरा यानेचे नताशा हिची फसवणूक केली आहे. तिने कलम 161 नुसार पोलिसांकडे जबाब नोंदवला होता.
- नताशा हिने सांगितले की, डॉ. लूथरा याने तिला लग्नाची आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यात ती गरोदर राहिली होती. डॉ. लूथरा यानेच तिचा गर्भपातही केला. डॉ.लूथरा नताशाला फोन करून मानसिक त्रासही देत होते.

30 जूनला केला होता गर्भपात, डॉक्टरचे अनेक तरुणींसोबत संबंध
- डॉ.लूथरा याचे अनेक तरुणींसोबत संबंध आहेत.  
- नताशा गरोदर राहिल्यानंतर डॉ. लूथरा याने तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नंतर 30 जूनला दुपारी 12 वाजता डॉ.झारिया याने नताथाचा गर्भपात केला होता. यावेळी लकी सलुजा हा देखील होता.
- बरेला येथील फार्म हाऊसवर तो अनेक तरुणींना घेऊन जात होता.  
- लवकरच डॉ.लूथराच्या विरोधात अनेक पीडित तरुणी पोलिसांत तक्रार दाखल करू शकतात.

दोन दिवसांपासून नताशा बेपत्ता..
-आयडियल हिल्स येथे राहाणारी नताशा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. तिच्या घराला कुलूप आहे. नताशा कुठे गेली आहे, हे तिचे नातेवाइक आणि शेजारच्यांनाही माहीत नाही.  
- नताशाचा मोबाइलही बंद आहे.

काय आहे प्रकरण?
- डॉ.लूथराने दावा केला आहे की, लकी सलूजा याने नताशा चावला हिच्या नावाने एक पत्र पाठवले होते.
- त्यात लिहिले आहे की, नताशा ही डॉक्टरांकडे उपचारासाठी गेली होती. दरम्यान डॉ. लूथराने तिला लग्नाचे आमिष दाखवले.
- डॉक्टरविरोधात पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा खटला भरला आहे.

या प्रकरणाशी संबंधित फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...