आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram And Narayan Were Tortured Police Statement Filed By The Wife Of Sai

आसारामच्‍या मुलाने केला अनेक महिलांवर बलात्‍कार, पत्‍नीनेच दिली पोलिसांना माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण सांई आणि जानकी देवी. - Divya Marathi
नारायण सांई आणि जानकी देवी.
इंदौर - स्‍वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू याची सून तथा नारायण सांई याची पत्‍नी जानकी देवी हरपलानी यांनी मंगळवारी पती, सासरा (आराराम) यांच्‍या विरुद्ध खजराना पोलिस ठाण्‍यात बयान दिले. हे दोघे आपला मानसिक छळ करतात असा आरोप त्‍यांनी केला. या प्रकरणी त्‍यांनी सप्‍टेंबरमध्‍ये तक्रार दिली होती. त्‍यानंतर नारायण सांई याने त्‍यांना नोटिस पाठवून कायदेशीर कारवाई करण्‍याची धमकी दिली होती.
पत्‍नीने सांगितले, नारायण साई भक्‍त महिलांवर करत होता बलात्‍कार
नारायण साईच्‍या पत्‍नी जानकी देवी या दुपारी 2 वाजता आपले वकील रोहित यादव यांच्‍यासोबत हरपलानी पोलिस ठाण्‍यात पोहोचल्‍या. त्‍यांनी पोलिसांना सांगितले की, ''नारायण हा नराधम होता. तो अल्‍पववयीन, वयात आलेल्‍या, विवाहित आणि अविवाहित अशा कुठल्‍याही वयोगटातील मुली, महिलांशी लालच देऊन, धमकी देऊन प्रसंगी वशीकरण करून शरीर संबंध प्रस्‍थापित करत होता. याला मी विरोध करत होते तर मलाच तो जीवे मारण्‍याची धमकी देत होता. प्रसंगी मी आत्‍महत्‍या करण्‍याचाही प्रयत्‍न केला. सतत होत असल्‍या छळामुळे मला अनेक आजारांनी ग्रासले आहे'', असे त्‍या म्‍हणाल्‍या.
नोटिस देऊन दिली धमकी
नारायण याने आपले वकील डी. एन. रामटेके यांच्‍या मार्फत जानकी यांना नोटिस पाठवली. यामध्‍ये म्‍हटले, जानकीसोबत लग्‍न करण्‍यासाठी तिच्‍या कुटुंबीयांना आपल्‍या दबाव आणला. त्‍यामुळे हे लग्‍न कायदेशीररीत्‍या झाले नाही, असे या नोटिसमध्‍ये म्‍हटले. तसेच जानकी यांच्‍यावर आश्रमातील दान हटप करणे, रासलीलेत तल्‍लीन होणे असे आरोपही नारायण यांनी केले असून, कायदेशीर कारवाई करण्‍याची धमकी दिली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...