आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Arrested By Jodhpur Police In Sexual Assault Case

आसाराम बापुंना एका दिवसाची पोलिस कोठडी, समर्थकांचा रेल रोको

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर/जोधपूर - 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी जोधपुरच्या स्थानिक न्यायालयाने आसाराम बापुंना एका दिवसाची पोलिस कोठडी बजावलेली आहे. आज दिवसभर जोधपूर पोलिसांनी आसाराम बापुंची कसून चौकशी केली. दरम्यान, या चौकशीतून काय माहिती हाती आली, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

आसाराम बापू यांना शनिवारी रात्री 12.30 वाजता जोधपूर पोलिसांनी इंदूरच्या आश्रमातून अटक केली. आसाराम बापू यांना घेऊन पोलिस जोधपूरमध्‍ये दुपारी 12 वाजताच्‍या सुमारास दाखल झाले होते. बापूंना शनिवारी रात्री उशिरा आश्रमातून बाहेर आणण्यात आले आणि 8 कारच्या ताफ्यासह विमानतळावर नेण्यात आले. जोधपूर पोलिसांनी बापूंना तवेरा गाडीत बसवले, तेव्हा सर्मथकांनी प्रचंड गदारोळ केला. परंतु पोलिसांनी जुमानले नाही. लाठीमार करत सर्मथकांना आश्रमाबाहेर पडू दिले नाही. गाडीत मध्यभागी बापू तोंड झाकून घेतलेल्या अवस्थेत होते. सकाळी पहिल्या फ्लाइटने दिल्लीमार्गे त्यांना जोधपूरला नेण्यात आले.

दरम्‍यान, आसाराम समर्थक आक्रमक झाले असून रविवारी दुपारी त्‍यांनी उल्हासनगरमध्ये रेल रोको आंदोलन केले. यामुळे मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईत आज मेगाब्‍लॉक असल्‍यामुळे जनता आधीच त्रस्‍त होती. त्‍यात या आंदोलनामुळे आणखी मनस्‍ताप झाला. सुमारे 100 ते 150 समर्थकांनी उल्‍हासनगर रेल्‍वे स्‍थानकाजवळ रेल रोको केले.

आसाराम बापुंना जोधपूर येथील आश्रमात नेण्‍यात आले आहे. आश्रमाभोवती कडक सुरक्षा असून आसाराम बापुंची कडक चौकशी करण्‍यात येणार आहे. प्राथमिक चौकशीमध्‍ये आसाराम बापुंच्‍याविरोधातील आरोपांमध्‍ये तथ्‍य असल्‍याचे पोलिस उपायुक्त अजय लांबा यांनी सांगितले. दरम्‍यान, नवी दिल्‍लीत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्‍या निवासस्‍थानाबाहेर निदर्शने करण्‍यात आली. निदर्शकांनी आसाराम बापूंना फासावर चढविण्‍याची मागणी केली आहे.

आसाराम बापुंना अटक झाल्‍यानंतर जोधपूरमध्‍ये त्‍यांच्‍या आश्रमाच्‍या परिसरात तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती हताळण्‍यासाठी पोलिसांनी आरएसीच्‍या 4 कंपनी तैनात केल्‍या आहेत. हा आश्रमही रिकामा करण्‍यात आला आहे. इंदूरहून त्‍यांना विमानाने दिल्‍लीला नेण्‍यात आले. विमानत ते हातात माळ घेऊन जप करत होते. दिल्‍लीहून ज्‍या विमानाने त्‍यांना जोधपूरला नेण्‍यात आले, त्‍यात त्‍यांचे 8-10 समर्थकही होते.

इंदूरच्‍या आश्रमात पोलिसांनी त्‍यांची चौकशी करण्‍याचा प्रयत्‍न केला होता. परंतु, त्‍यांनी सहकार्य केले नाही. त्‍यांची वैद्यकीय चाचणीही करण्‍यात आले. त्‍यातून ते केवळ आजारपणाचा बहाणा करत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍यानंतर त्‍यांना अटक करण्‍यात आली.

कसे घडले दिवसभर नाट्य, वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...