आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम यांची मुलगी भारती, भाऊ-वडिलांना मुली पूरवण्याचा होता आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साध्वी भारती - Divya Marathi
साध्वी भारती
इंदूर - स्वंयघोषित संत आसाराम यांचा मुलगा नारायण साईवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर आसाराम यांचे कुटुंब चर्चेत आले आहे. आसाराम यांच्या कुटुंबावर लावण्यात आलेल्या आरोपातून त्यांची मुलगी देखील सुटलेली नाही. माध्यमांपासून चार हात लांब राहाणारी त्यांची मुलगी भारती हिच्यावर भाऊ नारायण साई आणि वडील आसाराम यांच्यापर्यंत मुली पोहोचवण्याचा आरोप होता. या प्रकरणी भारतीविरोधात लुकआऊट नोटीस जारी झाली होती. मात्र नंतर भारती आणि इतर साध्वींची अंतरिम जामीनावर सुटका झाली होती.
भारती, आसाराम यांच्या कुटुंबातील तिसरी आणि महत्त्वाची सदस्य आहे. लहानपणी तिचे नाव भारतीबेन होते, वयाच्या 12 व्या वर्षी दीक्षा घेतल्यानंतर ती साध्वी भारती झाली. तिचे एम.ए पर्यंत शिक्षण झाले आहे. आसाराम यांनी 1997 मध्ये शिष्य हेमंतसोबत तिचे लग्न लावून दिले. हे लग्न जास्त दिवस टिकले नाही. तीन वर्षांनी हेमंत तिच्यापासून वेगळा झाला.

आसाराम कुठे आहे ?
आसाराम अल्पवयीन विद्यार्थीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. त्यांना अजूनही जामीन मंजूर झालेला नाही. देशातील अनेक दिग्गज वकीलांची फौज उभी करुनही अद्याप त्यांना जामीन मिळालेला नाही. अल्पवयीन विद्यार्थीनीसह गुजरातमधील दोन बहिणींनी देखील आसाराम यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

आताच्या पाकिस्तानात झाला होता आसाराम यांचा जन्म
आसाराम यांचा जन्म 17 एप्रिल 1941 मध्ये बिरानी नावाच्या गावात झाला होता. हे गाव आता पाकिस्तानात आहे. फाळणीनंतर आसाराम यांचे कुटुंब भारतात आले. त्यानंतर ते या शहरातून त्या शहरात फिरत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर आसाराम यांनी चहाच्या हॉटेलवर काम केले. याच दरम्यान त्यांनी शिक्षण सोडले. वयाच्या 15 व्या वर्षी आसाराम घरातून पळून जाऊन आश्रमात राहु लागले. त्यानंतर त्यांची समजूत काढुन कुटुंबियांनी घरी आणले आणि लग्न करुन दिले. आसाराम यांची पत्नीचे नाव लक्ष्मी आहे. त्यांना दोन मुले आहेत एक नारायण साई आणि दुसरी भारती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारतीचे फोटोज..