आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोरखधंद्यातून प्रतिवर्षी 300 कोटी रुपये कमावतो आसाराम बापू!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- बलात्काराच्या आरोपावरून तुरुंगाची हवा खाणार्‍या स्वयंघोषित आध्यात्मिक संत आसाराम बापूच्या विषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, आसाराम यांचा खासगी सावकारीचा धंद्दा सुरु असून तो यातून प्रतिवर्षी सुमारे 300 कोटी रुपये कमावतो. प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी टाकलेल्या छापेमारीत ही माहिती समोर आली आहे.

इंदूर शहरातील 16 ठिकाणी प्राप्तीकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले. रियल एस्टेटच्या नावाखाली आसारामाचा खासगी सावकारी सुरु होती. इतकेच नव्हे तर सराफापासून अनेक गोरखधंदे राजरोसपणे सुरु होते. या धंद्यातून आसारामाला प्रतिवर्षी 300 कोटी रुपये व्याज रुपात मिळतात.

प्राप्तीकर विभागाच्या छापेमारीत मोहन लुधियानी व इतर व्यापार्‍यांकडून महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जप्त करण्‍यात आले आहे. इंदूरसह परिसरात आसारामाने अनेक लोकांना कर्ज रुपात रुपये दिले आहे. मोहन लुधियानी हा चहा, रियल एस्टेटसह आसाराम ट्रस्टचा संपूर्ण कारभार पाहतो. तो गुरुकुल स्कूलचा देखील संचालक आहे. कर्ज रुपात कोट्यवधींचा व्यवहार झाला असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या कारवाईत श्रीराम बिल्डरच्या घरातून दोन कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. कारवाई अजून सुरु आहे.

42 पोत्यांमध्ये मिळाले दस्ताऐवज
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी आसाराम यांना अटक झाली होती. त्यावेळी त्यांच्या आश्रमातून पोलिसांनी 42 पोते दस्ताऐज जप्त केले होते. कोणाला किती रुपये व्याजाने दिले आहेत, यासंदर्भात माहिती आहे. मध्यप्रदेश, गुजरातसह संपूर्ण देशात हे जाळे पसरले आहे. प्राप्तीकर विभाग या प्रकरणी चौकशी करत आहे. काही महिन्यांपूर्वी इंदूरचे केशव नाचानी यांच्या घरी प्राप्तीकर विभागाने केलेल्या कारवाईत अनेक दस्ताऐवज सापडले होते. यातही आसारामाचे नाव समोर आले होते. या आधारावर सुरतमध्ये प्राप्तीकर विभागाने छापेमारीची योजना आखली होती.

देशातील अनेक शहरांमध्ये सुरु आहे कारवाई
इंदूरमध्ये गुडरिक चहा कंपनीचे मालक लुधियानी व लुधियानी याच्याशी संबंधित बिल्डर अनिल अगरवाल, शशी भूषण खंडेलवाल, विजय अगरवाल, तेजिंदरसिंह घुम्मन, निर्मल अगरवाल, विष्णु गोविंद राम शर्मा, केशव नाचानी यांच्याकडे प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यानी गुरुवारी एकाच वेळी छापे मारले. आजही (शुक्रवार) कारवाई सुरु राहाणार आहे.

याशिवाय घनश्यामदास अॅण्ड कंपनी, श्रुति स्नॅक्स प्रा. लि., ओएसिस डेव्हलपर्स, श्रीराम बिल्डर्स, अपोलो रियल एस्टेट प्रा.लि., कोन्कोर्ड टी पॅकिंग प्रा.लि., डिजिना रियल एस्टेट डेव्हलपर्स, जीएसएमटी रियल एस्टेट डेव्हलपर्सची चौकशी सुरु आहे.

भोपाळमध्ये रवींद्र सिंह भाटेजाची चौकशी सुरु आहे. इंदूर-भोपाळसह गुजरातमधील सुरत, बडोदा, अहमदाबाद तसेच महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि कोलकाता, जयपूर, दिल्लीमध्ये कार्रवाई सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.