आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजार कोटींच्या संपत्तीचे मालक आहे आसाराम, पाहा कसे जगत होते LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाराम - Divya Marathi
आसाराम
भोपाळ - नारायण साईची पत्नी जानकीने केलेल्या आरोपानंतर आसाराम यांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आसाराम आणि नारायण दोघेही तुरुंगात कैद आहेत आणि जानकी त्यांच्यासंबंधी नवे-नवे खुलासे करत आहे. तुरुंगात जाण्याआधी आसाराम उत्तर भारतातील महत्त्वाचे संत म्हणून नावारुपास आले होते. त्यांचा प्रवास हेलिकॉप्टर आणि लक्झरी गाड्यांमधून होत होता. मात्र सुरुवातीपासून अशी परिस्थिती नव्हती. एका अहवालानूसार, आसाराम यांच्याकडे 10 हजार कोटींची संपत्ती आहे. त्यापैकी स्वयंघोषित संत आसाराम यांनी 1677 कोटी रुपेय कर्जावर वाटलेले आहेत. त्याचे 300 कोटी रुपये व्याज त्यांना मिळते.
कशी होती लाइफ
आता तुरुंगात एकांतवासात जगत असलेले आसाराम कायम भक्तांच्या गराड्यात राहात होते. आलिशान गाड्यांमधून फिरत होते. अनेक नेते आणि अभिनेते त्यांच्या चरणात लीन होत होते. जोधपूर, सूरत, मुंबई, जबलपूर आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे त्यांचे आश्रम आजही आहेत. त्यांचे वादग्रस्त चरित्र समोर आल्यानंतर जबलपूर येथील आश्रम तोडण्यात आला तर, नाशिकमधील आश्रमाची जमीन अतिक्रमण असल्याचे समोर आल्यानंतर तेथील आश्रमावर बुलडोजर चालवण्यात आला. आसाराम यांचा कारभार एवढा मोठा आहे की त्याच्या तपासासाठी इंदूर आणि भोपाळसह सूरत, बडोदा, अहमदाबाद, मुबंई, पुणे, कोलकाता, जयपूर आणि दिल्ली येथे तपास करावा लागत आहे.
कोण आहे आसाराम
आसाराम यांचा जन्म भारत - पाकिस्तान फाळणीच्याआधी 17 एप्रिल 1941 मध्ये आताच्या पाकिस्तानातील बिरानी गावात झाला होता. फाळणीनंतर आसाराम यांचे कुटुंब भारतात आले. या निर्वासित कुटुंबाला लवकर कुठेही बस्तान बसवता आले नाही. त्यामुळे ते या शहरातून त्या शहरात फिरत होते. याच दरम्यान आसाराम यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी आसाराम यांच्यावर येऊन पडली. त्या दिवसात आसाराम यांनी शिक्षण सोडले आणि मिळेल ते काम केले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी घरातून पळून जाऊन आसारामने एका आश्रमात आश्रय घेतला. त्यांच्या मामा आणि कुटुंबियांनी त्यांना समजावून घरी आणले आणि लग्न लावून दिले. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीदेवी. त्यांना दोन मुले झाले, मुलगा नारायण आणि मुलगी भारती.

आसाराम यांच्या संपत्तीचा खुलासा
आसाराम यांच्या संपत्तीचे एकूण मुल्य (स्थावर आणि जंगम मालमत्ता) 10 हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यात देशात विविध ठिकाणी असलेल्या जमीनींची किंमत 4100 कोटी रुपये तर, 500 जणांना कर्जावर दिलेले पैसे आहेत 1677 कोटी रुपये. या कर्जाचे त्यांना 300 कोटी रुपये व्याज मिळते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे आयुष्य जगत होते आसाराम