आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसारामबापू आश्रमात, दारी पोलिस; ते 7 तास!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले संत आसारामबापू यांना समन्स बजावण्यासाठी इंदूरच्या आश्रमात सकाळी सव्वासात वाजता आलेल्या जोधपूर पोलिसांना सात तास ताटकळत बसावे लागले. शेवटी समन्स घेण्यासाठी बापूंना बाहेर यावेच लागले!

बापूंना बाहेर येण्यास इतका वेळ का लागला?
पोलिस येताच बापूंच्या सर्मथकांनी ‘बापू भेटणार नाहीत.. समन्सही घेणार नाहीत,’ असे सांगत त्यांना रोखले. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच सर्व पांगले. पोलिस आश्रमाच्या परिसरात दाखल झाले तेव्हा बापू साधनेत असल्याचे सांगण्यात आले. पोलिस एव्हाना चांगलेच भडकले होते.

बाहेर पोलिसांची तपश्चर्या आणि आत बापूंची साधना तर बाहेर सर्मथकांची नारेबाजी सुरू होती. बापूंनी समन्स घेतले नाही तर दारावर डकवून जाऊ, असे पोलिसांनी बजावले. आता हालचाली वाढल्या. बातमी आत पोहोचली. पोलिस अटक करण्यासाठी आलेले नाहीत हे स्पष्ट झाले. बापू 2 वाजता बाहेर येतील, असा निरोप आला. दरम्यान, साडेबारा वाजता भाजप आमदार रमेश मेंदोला बापूंना भेटण्यासाठी आले. आत आमदारासह काही लोकांची वकील तसेच कायदेतज्ज्ञांशी मोबाइलवर सल्लामसलत सुरू होती, असे सांगितले जाते. सात तासांनी बापू बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर तणाव स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी त्यांच्या हाती समन्स सोपवले. बापूंनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. पुन्हा वकिलाचा सल्ला घेतला तेव्हा चिडलेल्या बापूंनी स्वाक्षरी केली आणि पोलिस बाहेर पडले.


सात तासांनंतरची ‘कथा’ निराळीच
पोलिस निघून गेले, बापू आसनावर बसलेले. समोर अनुयायांची गर्दी. त्यातच वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी आला. प्रश्नांची सरबत्ती. तुमच्यावर गंभीर आरोप आहेत. बापू म्हणाले, सगळे खोटे आहेत. जोधपूरच्या कुटियात असे काही होऊच शकत नाही. आपसात बोलले तरी दूरवर आवाज जातो. मी दीड तास तोंड दाबले आणि कोणाला आवाजही गेला नाही. असे कसे होऊ शकते? भेटलो असेल. अनेकांना भेटतो. पण सांगितले जाते तसा भेटलो नाही. प्रश्न थेट झाले. तुम्हाला अटक होऊ शकते? उत्तर आले, नाही, 17 वर्षांसाठी तुरुंगात टाका. सत्याला आच नाही. वार्ताहराने विचारले, स्वत:ला निदरेष कसे सिद्ध करणार? भक्तांनी जयघोष सुरू केला. बापू म्हणाले, कॅमेरा तिकडेही फिरवा. मला रोज 20 देशांचे लोक बघतात, ऐकतात. चेहर्‍यावर संताप दिसत होता. पुन्हा प्रश्न. बापू म्हणाले, जरा भक्तांशी बोला. म्हणाले, सकाळी उठून पाणी प्यावे. 9 ते 11 दरम्यान जेवणे चांगले. वार्ताहराचा प्रश्न. रागातही हसत बापू म्हणाले, रात्री 1 ते 3 वेळेत जागणे धोकादायक. वार्ताहर म्हणाला, उत्तर तर द्या. कानाडोळा करून बापू म्हणाले, टेन्शन 3 प्रकारचे. शारीरिक, मानसिक व बौद्धिक. वार्ताहराने प्रश्न विचारला. बापूंचे सुरू- ओम. ओम. ओम.! भक्तांचेही भजन. वार्ताहराचे एकच उत्तर द्या. बापू म्हणाले, हसत राहा. टेन्शन पळून जातात. फ्लाइटची वेळ झाली म्हणत बापू मुंबईमार्गे सुरतसाठी निघून गेले.


पीडितेच्या मैत्रिणीकडून आश्रमातील लोकांनी वदवले.. हे षड्यंत्रच!
या नाट्यानंतर बापूंचा सत्संग झाला. आश्रमाच्या पदाधिकार्‍यांनी एका मुलीला माध्यमांसमोर उभे केले. ती म्हणाली, ‘पीडित मुलगी माझी मैत्रीण आहे. गेल्या वर्षी छिंदवाडा आश्रमात आम्ही सोबत होतो. मी फोनवर विचारले तेव्हा आई-वडिलांच्या दबावाखातर बापूंवर अत्याचाराचा खोटा आळ घेतल्याचे तिने सांगितले.’ पत्रकारांनी नाव विचारले तेव्हा तिने सांगण्यास नकार दिला. काहींनी तिचे नाव अश्विनी असल्याचे सांगितले.