आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्मिक संत आसाराम बापूंच्या सेवकाचा छिंदवाडा आश्रमात संशयित मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छिंदवाडा- आश्रमातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक आसाराम बापू अनेक महिन्यांपासून तुरुंगात कैद आहेत. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील छिंदवाडा आसाराम आश्रमातील एका विश्वासू सेवकाचा संशयित मृत्यू झाल्यामुळे आसाराम पुन्हा एकदा संशयाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे.

छिंदवाडा आश्रमात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेला सेवक पतीराम डेह‍रिया याचा मृत्यु सर्पदंश झाल्याने झाला आहे. परंतु पतीराम याचा मृत्यू की हत्या? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. पतीरामचा मृत्यू झाल्याचे सोमवारी (27 जुलै) उघडकीस आले. रविवारी रात्री उशीरा पतीराम याचा मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, पतिराम डेहरिया रविवारी रात्री उशीरापर्यंत त्याने जप केला. नंतर पतीराम आल्या खोलीत जाताना शिडीवर त्याला सापाने दंश केला. पतीरामला सापाने दंश केल्यानंतर आश्रमात खळबळ उडाली. आयुर्वेदीक औषधींनी पतीरामवर प्रथोमोपचार करण्यात आले. नंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचार सुरु असताना पतीराम याची प्राणज्योत मालवली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसाराम बापूंचे अनेक रहस्य पतीरामला माहित होते. तसेच पतीरामला सर्पदंश झाला, त्या ठिकाणी साप पोहोचणे अशक्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पतीराजच्या मृतदेहचे शवविच्छेदन झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. पोलिस आश्रमातील अन्य सेवकांची कसून चौकशी करत आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आसाराम यांच्याविरुद्ध साक्ष देणार्‍या सेवकावरही झाला होता बेछूट गोळीबार....