आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attack Planing On Sushilkumar Shinde, Terrorist Abu Confessed

सुशीलकुमार शिंदें यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता,अतिरेकी अबूची कबूली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सिमीचा दहशतवादी अबू फैझल याने अमेरिकी व पाकिस्तानी दूतावासांना स्फोटाने उडवण्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. इतकेच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सोलापुरातच हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. यासाठी शिंदे यांची रेकीही करण्यात आली होती, अशी माहिती मध्य प्रदेश एटीएसने केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली आहे.
मध्य प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तीन दिवसांपूर्वी अबू फैझलला सेंधवा येथून अटक केली होती. पाकिस्तानातील तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेशी आपले संबंध मजबूत करण्यासाठी अबू फैझल भारतातील व्हीआयपी व्यक्ती व मुख्य शहरांवर हल्ला करण्याची योजना आखत होता.