आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंड्यातून बाहेर आली मगरीची 188 पिले, दुर्मिळ क्षण कॅमेरात कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील एक दुर्मिळ क्षण कॅमेरात कैद करण्यात आला आहे. देवरी येथील नॅशनल चंबल सेंक्चुरीच्या ईको सेंटरमध्ये मगरीच्या 188 पिले अंड्यातून बाहेर आलीत. 2011 ते 2014 दरम्यान मगरींची संख्या 423 होती. अवघ्या एक वर्षात संख्येत वाढ होऊन ती 611 वर पोहोचली आहे.

अशी आहे प्रक्रिया...
> मार्च महिन्यात चंबळ खोर्‍यात वाळूवर मगरी अंडी घालतात.
> हेचिंगसाठी अंडी 30 ते 35 डिग्री सेंटीग्रेडच्या तापमानात ठेवले जाते.
> जन्माच्या 24 तास आधी अंड्यातून 'क्रॉकिंग साउंड' (त्याला मदर कॉल म्हटले जाते.) येतो. त्याकडे ईको सेंटरचे कर्मचारी लक्ष ठेवून असतात.

मुरैनापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या रघुनाथपुर भागातील चंबळ खोर्‍यातून मगरीचे 200 अंडी 16 मे रोजी देवरी ईको सेंटरमध्ये आणले होते.

अशी केली जाते हेचिंग
> अंडी हेचिंग कक्षात वाळूत ठेवले जाते.
>14 दिवसांत अंड्यातून क्रॉकिंग साउंड येण्यास सुरवात झाली.
> क्रॉकिंग साउंड आल्यानंतर अंडी वाळूतून बाहेर काढली जातात. नंतर काही क्षणातच अंड्यातून पिले बाहेर येतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मगरीच्या पिलांची छायाचित्रे...