आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baby Born In Suvarna Jayanti Train In Madhya Pradesh

ट्रेनमध्ये झाली प्रसुती, रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तासभर तडफत राहिली महिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- डबरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर लेटलेली महिला.)
डबरा (मध्य प्रदेश)- सासरी जयपूरला जात असलेल्या एका महिलेची सुवर्णजयंती ट्रेनमध्ये ग्वाल्हेर आणि डबरा स्टेशनदरम्यान प्रसुती झाली. त्यानंतर प्रवाशांनी चेन पुलिंग करुन महिलेला डबरा स्टेशनवर उतरवले. तिला प्लॅटफॉर्मवर लेटवले. त्यानंतर रेल्वेचे अधिकारी आणि प्रवाशांनी अॅम्ब्युलंससाठी 108 क्रमांकावर वारंवार फोन लावले. पण काहीच रिप्लाय मिळाला नाही. उलट एकदा फोन लागला तर प्रवाशांना शिव्याच ऐकाव्या लागल्या.
डबरा येथील आरोग्य केंद्रात अॅम्ब्युलंसची सुविधा नाही. त्यामुळे सुमारे तासभर डबरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर महिला लेटून होती. यावेळी ही घटना कव्हर करायला गेलेल्या पत्रकारांनी खासगी अॅम्ब्युलंस बोलवून महिलेला आरोग्य केंद्रात भरती केले.
या महिलेचे नाव अनोखी कुम्हार असून ती नीम चौकी धूमल पाडा सवाई माधवपूर येथील रहिवासी आहे. तिने मंगळवारी सुवर्णजयंती ट्रेन पकडली. तिचे पती राधेश्याम कुम्हार जयपूरमध्ये काम करतात. त्यांच्याकडे तिला जायचे होते. परंतु, ती चुकीच्या ट्रेनमध्ये चढली होती. या दरम्यान ग्वाल्हेर आणि डबरा स्टेशनच्या मध्ये तिला प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या.
बघता बघता तिची रेल्वेतच प्रसुती झाली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशांनी चेन पुलिंग करुन तिला डबरा स्टेशनवर उतरवले. स्टेशन मास्टर आणि जीआरपीच्या जवानांकडे महिलेला सोपवले. त्यानंतर तिची देखभाल करण्यासाठी एका दायीला बोलविण्यात आले. त्यानंतर 108 क्रमांकावर फोन लावला. पण काहीच मदत मिळाली नाही.
डबरा स्टेशन परिसरात चांगलेच थंड वातावरण आहे. या महिलेकडे पुरेसे गरम कपडेही नव्हते. काही प्रवाशांनी आपल्याकडील कपडे या महिलेला दिले. देखभालीसाठी आलेल्या दायीने बाळाला गरम कपड्यांमध्ये गुंडाळले. महिलेला काही कपडे दिले. जर वेळेवर या महिलेला आणि बाळाला गरम कपडे मिळाले नसते, तर दोघांची प्रकृती बिघडली असती. दोघांवर थंडीचा विपरित परिणाम झाला असता, असे दायीने सांगितले.
पुढील स्लाईडवर बघा, रेल्वेत प्रसुती झालेली महिला... असे लेटवले प्लॅटफॉर्मवर... इतर प्रवाशांनी दिले कपडे...