आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

41 युद्धात कधीही हरले नाही बाजीराव, समाधी पाहून वंशंजांचे डोळे पाणावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजीरावांची समाधी पाहून बेगम शबीना यांना रडू कोसळले. - Divya Marathi
बाजीरावांची समाधी पाहून बेगम शबीना यांना रडू कोसळले.
सनावद/इंदूर - बाजीराव मस्तानी चित्रपटाने भलेही बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली असेल आणि अनेक पुरस्कार पटकावले असतील, मात्र ज्या व्यक्तीच्या जीवनावर हा चित्रपट होता त्याच्या समाधीची अवस्था अतिशय दयनीय आहे. येथे आलेले त्यांचे वंशज आणि भक्तांच्या डोळ्यात पाणी आले. बाजीराव हे असे मराठा योद्धा होते ज्यांनी 20 वर्षांच्या पेशवाईच्या काळात 41 युद्धे लढली आणि एकाही युद्धात पराभव पाहिला नाही.

वंशज समाधीवर येण्याचे काय होते कारण
- बाजीराव पेशवे यांची 276 वी पुण्यतीथी गुरुवारी झाली. यानिमीत्ताने मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रावरखेडी येथील त्यांच्या समाधीला नमन करण्यासाठी त्यांचे 7व्या, 8व्या आणि 9व्या पिढीचे वंशज आले होते.
- बाजीरावांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी आलेले 7 व्या पिढीचे अश्फाक अली बहादूर, आठव्या पिढीचे शादाब अली बहादूर आणि अ्श्फाक अली यांची मुलगी यास्मिन, नवव्या पिढीचे अबरार अली, अयान अली बहादूर भोपाळवरुन येथे आले होते.
- तर, इंदूरहून त्यांचे नातेवाईक आवेश अली देखिल येथे आले होते.
- यावेळी बाजीराव यांच्या पराक्रमाची गाथा ऐकून शादाब अली बहादूर यांची बेगम शबीना बहादूर यांना अश्रू अनावर झाले होते.
- श्रद्धांजली सभेत शादाब अलींनी सांगितले, की बाजीराव पेशव चित्यासारखे चपळ होते, आजही आपल्याला सनावद येथे येण्यास तीन तास लागतात. येथे येण्यासाठी डांबरी रस्ता नाही. समाधीची दुरावस्था झाली आहे.

समाधीच्या जीर्णोद्धारासाठी सरकार कडून 8 कोटी रुपये
- त्यांनी सांगितले, की समाधीच्या जीर्णोद्धारासाठी सरकारने 8 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र आतापर्यंत 27 लाखच खर्च झाले आहेत.
- ते म्हणाले, मी जेव्हा दूरवरुन समाधीचे गेट पाहिले तेव्हाच माझ्या डोळ्यात पाणी आले होते.
- बांदाचे नवाब अश्फाक अली बहादूर यांचे चिरंजीव शादाब अली बहादूर म्हणाले, की ते बाजीराव पेशव्यांचा इतिहास लिहित आहेत.
- ते म्हणाले, 'मला येथे सांगितले पाहिजे की बाजीराव पेशवे आणि शिवाजी महाराजा मुस्लिमांचे शत्रू नव्हते. ते मुस्लिम विरोधी नव्हते.'
- अफगाणी आणि मुगल भारतीय नव्हते, आम्ही आर्यन आहोत.
- जेव्हा अफगाणी आणि मुगलांनी भारतात घुसखोरी केली तेव्हा शिवाजी आणि बाजीराव यांनीच त्यांचा विरोध केला होता.
पुढील स्लाइडमध्ये, मस्तानी होती जगातील सर्वात सुंदर स्त्री