Home »National »Madhya Pradesh» Bajiro Peshva Was Brahman But His Ancestors Became Muslim

यामुळे मुस्लिम झाला पराक्रमी बाजीरावांचा मुलगा, ही आहे खरी कथा

एक हातात यज्ञोपवीत आणि दुसऱ्या हातात तलवार ठेवणारे बाजीराव पेशवे कोकणस्थ ब्राह्मण होते, परंतु त्यांचे आणि मस्तानीचे वंशज

दिव्य मराठी वेब टीम | Aug 19, 2017, 12:49 PM IST

  • वीर बाजीराव पेशव्यांच्या वंशजांनी (इनसेट) त्यांचे हे चित्र जतन करून ठेवले आहे.
इंदूर - एक हातात यज्ञोपवीत आणि दुसऱ्या हातात तलवार ठेवणारे बाजीराव पेशवे कोकणस्थ ब्राह्मण होते, परंतु त्यांचे आणि मस्तानीचे वंशज मुसलमान आहेत. बाजीरावांच्या सातव्या पिढीतील लोक सांगतात की जर इतिहासाने ते वळण घेतले नसते, तर ते सर्व आज हिंदू असते. इंदूरमध्ये राहणाऱ्या जुबेर बहादूर जोश यांनी सांगितल्यानुसार मुस्तानींच्या मुलाचे नाव कृष्णाजी राव होते, त्यांचे पालनपोषण हिंदू रीतिरिवाजानुसार झाले होते, पण पुण्यातील ब्राह्मणांच्या कर्मठपणामुळे त्यांच्या मुलाला इस्लाम स्वीकारावा लागला होता.
कृष्णाजीराव बनले शमशेर अली बहादूर...
- बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमाला जागोजागी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. तथापि, मस्तानी बुंदेलखंडाचे महाराज छत्रसाल यांची लाडकी मुलगी होती. मस्तानीची आई मुस्लिम होती. महाराजा छत्रसाल यांनी मस्तानीचे लग्न बाजीरावाशी लावले. तेव्हा पुण्यातल्या ब्राह्मण समाजाने नाराजी दाखवली होती. त्यांनी कधीच मस्तानीचा मनापासून स्वीकार केला नव्हता.
- बाजीरावांच्या सातव्या पिढीतील वंशज जुबेर बहादूर जोश इंदूरच्या विजयनगरात राहतात. निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबासह राहणारे जुबेर सांगतात, मस्तानीच्या मुलाचे नाव कृष्णाजी राव होते. त्यांच्या पालन-पोषण हिंदू रीतिरिवाजानुसार झाले होते. बाजीरावांनी त्यांच्या मुंजीचा मुहूर्त काढण्यासाठी पुण्यातल्या पंडितांना बोलावले होते. परंतु, एखाद्या मुसलमान आईच्या पोटी जन्मलेल्या मुलाची मुंज करणार नाही, असे म्हणून त्यांनी गोंधळ घातला.
- बाजीरावांनी त्यांना समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु पंडित तिळमात्र बदलले नाहीत. भल्याभल्यांना तलवारीने पाणी पाजणाऱ्या बाजीरावांना शेवटी या कर्मठांपुढे नमते घ्यावे लागले. त्यांनीच मग कृष्णाजीला आपल्या आईचा धर्म स्वीकारायला सांगितले.
- आणि मग अशा प्रकारे कृष्णाजीराव शमशेर अली बहादूर बनले. जोश म्हणाले, जर त्या वेळी पंडितांनी कृष्णाजीची मुंज केली असती, तर आम्ही सर्व आज हिंदू असतो.
- मस्तानीच्या मृत्यूनंतर शमशेर अली बहादूर यांची देखरेख बाजीरावांची पहिली पत्नी काशीबाई यांनी आपल्या मुलाप्रमाणे केली. त्यांना नंतर बांद्याची जहागिरी देण्यात आली होती.
प्रणामी संप्रदाय मानायची मस्तानी, पूजाही करायची अन् नमाजही पढायची
- जोश म्हणाले, मस्तानीची आई मुसलमान होती, पण ती महाराजा छत्रसाल यांच्या प्रणामी संप्रदायाला मानत होती. याचे प्रवर्तक एक हिंदू संत होते. मस्तानीला भलेही त्या वेळच्या पंडितांनी स्वीकारले नाही, पण ती हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या अद्भुत मिलाफाचे प्रतीक होती. ती कृष्णाची भक्त होती आणि नमाजही पढायची. पूजाही करायची आणि रोजाही ठेवत होती.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी काही खास फोटोज...

Next Article

Recommended