आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balancing Stone In Jabalpur Remain As It Was In Earthquake

8.2 तीव्रतेच्या भूकंपातही जागचा हलला नाही हा विस्मयकारी दगड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्य प्रदेश)- विनाशकारी भूकंपाने नेपाळ हादरले आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडले असून लाखो निर्वासित झाले आहेत. या भूकंपाने यापूर्वी आलेल्या भूकंपाच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत. 22 मे 1998 रोजी मध्य प्रदेशात 8.2 तीव्रतेचा भूकंप आला होता. पण या भूकंपाने फोटोत दाखवण्यात आलेला जबलपूर या शहरातील दगड जराही हलला नव्हता. विशेष म्हणजे या दगडाला बघितल्यावर असे वाटते, की जर कुणी साधा धक्का दिली तरी तो खाली पडेल.
मध्य प्रदेशात आलेल्या विनाशकारी भूकंपात जबलपूरमध्ये अनेक बहुमजली इमारतींचे नुकसान झाले होते. पण यात या विस्मयकारी दगडाला जराही धक्का लागला नाही. याला जबलपूरचा बॅलेंसिंग रॉक असेही म्हटले जाते. इंजिनिअर्सनी याची निर्मिती केलेली नाही. अनेक वर्षांपासून हा दगड असाच आहे. भूकंपात या दगडाचे जराही नुकसान का झाले नाही, तो खाली का पडला नाही याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न संशोधक करीत आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, या विस्मयकारी दगडाची आणखी छायाचित्रे....