आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मसमर्पणाच्या एक दिवस आधीच होणार होता फुलनचा खात्मा, विदेशी पत्रकार ठरणार होता निमित्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलन देवीने मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले होते. - Divya Marathi
फुलन देवीने मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले होते.
भोपाळ - दहशतीचे दुसरे नाव होते डाकूराणी फुलन देवी. वयाच्या 10व्या वर्षी लग्न. अनन्वीत छळ. त्यानंतर बलात्कार. ठाकूरांचा सूड. लुटमार आणि पळापळ. पोलिसांसोबत पाठशिवणीचा खेळ तर रोजचाच होता. त्यापासून वाचवत होते ते चंबळचे खोरे आणि दीन-दलित जनता. त्यांच्यासाठी ती देवी होती, जणू रॉबिनहूड. डाकूराणी फूलनदेवीची आज जयंती आहे. यानिमित्ताने DivyaMarathi.com सांगत आहे फुलनच्या आत्मसमर्पणाची कथा...
 
- फुलन देवीने फेब्रुवारी, 1983 ला मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. त्याच्या आदल्या दिवशी पोलिसांनी एक ब्रिफिंग केले होते. त्यावेळी फुलनदेवी तिच्या गँगसह उपस्थित होती. यावेळी एक अशी घटना घडली की त्यामुळे पत्रकार परिषदेतच पोलिस आणि फुलनची गँग यांनी एकमेकांवर संगिनी रोखल्या होत्या. आता फायरिंग होते की काय अशी धाकधूक तिथे उपस्थित सर्वांच्या मनात होती. 

- या पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकार कीर्ति सिंह यांनी सांगितले, की फुलन देवी आणि तिची गँग भिंड येथील एमजेएस कॉलेजमध्ये सरेंडर करणार होती. 
- त्याच्या एक दिवस आधी लहार येथील गेस्ट हाऊसमध्ये पोलिस मीडिला ब्रीफिंग करणार होते. यात फुलनदेवी आणि तिची गँगही उपस्थित राहाणार होती. 
- पोलिसांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. पोलिस अधिकारी पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. या संपूर्ण पत्रकार परिषदेत फुलनदेवी शांत होती. एक शब्दही ती बोलली नाही. ना पत्रकारांशी ना तिच्या सहकाऱ्यांशी. 
- यावेळी एक विदेशी फोटोग्राफर तिचे फोटो क्लिक करत होता. यामुळे संतप्त झालेल्या फुलन देवीने थेट त्याच्या श्रीमुखात भडकावली. 
- या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. तिथे उपस्थित एसटीएफ जवानांनी थेट फुलनवर रायफल रोखली. 
- त्यावर फुलनच्या गँगमधील साथीदारांनीही पोलिसांवर बंदूका रोखल्या. आता येथे गोळीबार होतो अशीच शंका सर्वांच्या मनात होती. 
- त्यावेळी भिंडचे तत्कालिन पोलिस अधीक्षक राजेंद्र चतुर्वेदी तिथे उपस्थित होते. पोलिस आणि फुलनच्या गँगने एकमेकांवर रोखल्या बंदूका पाहून ते देखील आश्यर्यचकित झाले. 
- त्यांनी हे प्रकरण शांतते मिटवले. 
 
फोटो घेतल्याने मारली थप्पड 
- 80च्या दशकात चंबळ खोऱ्याचे नाव देश-विदेशात गाजत होते. तेथील डाकूंच्या फोटोंना विदेशात मोठी किंमत मिळत होती. 
- याची माहिती डाकूंनाही होती. काही चतूर डाकू त्यांच्या फोटोंचे व्यवस्थित दामही वसूल करत होते.    
- त्यामुळेच फुलनला तिच्या परवानगीशिवाय तिचे फोटो घेण्याला अक्षेप होता. 
 
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या फुलनची कहानी... 
बातम्या आणखी आहेत...