आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ताडी\'च्या नशेत दिवसभर करतात डान्स, पान खाऊ घालून सुरु होते नव्या आयुष्याची सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जत्रेत ढोलाच्या तालावर दिवसभर थिरकतात आदिवासी, नटून-थटून सहभागी होतात युवती - Divya Marathi
जत्रेत ढोलाच्या तालावर दिवसभर थिरकतात आदिवासी, नटून-थटून सहभागी होतात युवती
झाबुआ/ इंदूर - मध्यप्रदेशातील निमाडमध्ये प्रसिद्ध भगोरिया मेला सुरु झाला आहे. ही जत्रा मुख्यतः भील्ल आणि भिलाला आदिवासिंच्या प्रेम आणि विवाहाशी संबंधित पारंपरिक जत्रा आहे. यात आदिवासी तरुण आपल्या मनपसंत जोडीदाराचा शोध घेतात. या जत्रेत मुलाला मुलगी पसंत आल्यानंतर तिच्या होकारासाठी तो तिची मनधरणी करतो. कुठे आणि कशी भरते जत्रा...

होळीच्या एक आठवडा आधी सुरू होते जत्रा
- निमाड भागात झाबुआ, धार, बडवानी आणि अलिराजपूर येथे होळीच्या निमीत्ताने भगोरिया उत्सव साजरा केला जातो.
- होळीच्या आठ दिवस आधी जत्रेला सुरुवात होते आणि होळीच्या दिवशी संपते. आदिवासी वर्षभर या जत्रेची उत्सूकतेने वाट पाहातात.
- रब्बी पिकांच्या काढणी नंतर होणारा हा उत्सव ग्रामीण संस्कृतीशीही जोडून पाहिला जातो.
- जत्रेत आदिवासी ताडीचे सेवन करुन असतात, त्यामुळे जत्रेतील मस्ती आणि तडीची धुंदीत ते दिवसभर नाचत असतात.

कसे करतात प्रेम व्यक्त
- ढोलावर थाप मारत तरुण जत्रेत सहभागी होतात. आदिवासी तरुणी देखिल नटून - थटून, विविधरंगी कपड्यांमध्ये पोहोचतात.
- मुले मनपसंत जोडीदार शोधतात. जेव्हा त्यांचा शोध एखाद्या मुलीजवळ आल्यानंतर पूर्ण होतो, तेव्हा ते तिला पानाचा विडा खाऊ घालतात.
- एखाद्या तरुणाला मुलगी पसंत पडल्यानंतर तो तिच्या चेहऱ्यावर लाल रंग लावतो. तिलाही तो आवडला तर ती देखिल त्याचा चेहरा रंगाने लाल करते. यानंतर दोघेही जत्रेतून पळून जातात.
- मात्र पहिल्या प्रयत्नात मुलीचा होकार मिळाला नाही, तर मुलाला तिचा होकार मिळेपर्यंत प्रयत्न करावे लागतात, तिची मनधरणी करावी लागते.
- दोघांची मने जुळल्यानंतर ते जत्रेतून पळून जातात यामुळेच या उत्सवाला - जत्रेला 'भगोरिया उत्सव' म्हटले जाते.
- यानंतर काही दिवसांनी आदिवासी समाज त्या दोघां पती-पत्नीचा दर्जा देतो.
कसा सुरु झाला भगोरिया उत्सव
- अशी मान्यता आहे, की भगोरिया उत्सवाची सुरुवात राजा भोजच्या काळात झाली होती. तेव्हा दोन भिल्ल राजांनी - कासूमार आणि बालून यांनी आपली राजधानी भगोर येथे जत्रेचे आयोजन करण्यास सुरुवात केली होती.
- हळु-हळु आसपासच्या इतर भिल्ल राजांनीही त्यांच्या राज्यात याचे अनुकरण केले, त्यामुळे जत्रेला भगोरिया म्हणण्यास सुरुवात झाली. वास्तविक यावर लोकांचे एकमत नाही.
- दुसरीकडे, भिल्ल समाजात हुंडा पद्धतीची उलट रित आहे. येथे मुली ऐवजी मुलगा हुंडा देतो. हुंडा पद्धतीपासून सुटका मिळविण्यासाठीच भगोरिया उत्सवाची सुरुवात झाली, असेही काहींचे म्हणणे आहे.

जत्रेत काय-काय
- तरुण गटा-गटाने, टोळीने ढोल - बासरी वाजवत सकाळीच जत्रेत सहभागी होता.
- तर आदिवासी मुली पारंपरिक दागिण्यांचा साज-श्रृंगार करुन, हातांवर टॅटू गोंदवून जत्रेला येतात.
- आदिवासी झिंग चढण्यासाठी ताडी पितात.
- वास्तविक आता काळाबरोबर जत्रेचा रंगही बदलला आहे. आता आदिवासी तरुण पारंपरिक कपड्यांऐवजी शर्ट-पँटमध्ये दिसतात. डोळ्यांवर गॉगल, हातात मोबाइल असा त्यांचा थाट असतो.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भगोरिया जत्रेचा अनोखा अंदाज

फोटो - गौरव मैलाना