आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानाचा विडा खाऊ घालून रंगत जाते प्रेम, जत्रेत गायब होतात युवक-युवती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगोरिया जत्रेतील मुली (फाइल फोटो) - Divya Marathi
भगोरिया जत्रेतील मुली (फाइल फोटो)
झाबुआ/ इंदूर - होळी-रंगपंचमी हा जसा रंगाचा उत्सव आहे तसाच तो प्रेमीजीवांना जवळ आणणारा उत्सव आहे. प्रत्येक राज्यात आणि समाजात त्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. मध्यप्रदेशातील झाबुआ अंचल येथे पानाचा विडा खाऊ घालून प्रेम व्यक्त करण्याचा मेळा भरतो - 'भगोरिया मेला'. झाबुआ अंचलमध्ये या मेळ्याला बुधवारी सुरुवात झाली आहे.

या दिवशी युवक - युवतींना आपल्या मनातील गुपीत उघड करण्याची पूर्ण परवानगी असते. ज्याच्यावर आपले प्रेम आहे ते त्याला उघड-उघड सांगण्याचा हा दिवस असतो. त्यासोबत मद्याच्या नशेत मस्त होऊन आपल्या जोडीदाराला घेऊन जत्रेत ते गायब होतात.

कसा असतो भगोरिया मेला...
- भगोरिया जत्रेची सुरुवात बुधवारी ढोल-ताशाच्या गजरात आणि नाच-गाण्यांसोबत झाली.
- युवक नवीन कपडे आणि डोळ्यांवर काळा गॉगल चढवून जत्रेत आले तर मुली पारंपरिक पद्धतीने साडी नेसून त्यावर दाग-दागिण्यांचा श्रृगांर करुन बेधूंद नाचत होत्या.
- काही मुलींनी तर हातावर टॅटू देखिल गोंदवून घेतले होते.
पुढील स्लाइडमध्ये
>> जत्रेत ताडीचे तरंग
>> भगोरियाची मस्ती
>> पारंपरिक पेहरावत आल्या युवती
>> गुजरात-राजस्थानची संस्कृती झळकली
बातम्या आणखी आहेत...