आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आता मलाही संगणक हाताळता येतो'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - "आता मलाही संगणक चालवण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.' जोधपूरचे निवृत्त सत्र न्यायाधीश डॉ. सुखराज भंडारी यांनी ही गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगितली. अशाच स्वरूपाचा आत्मविश्वास आज हजारो गृहिणी ज्येष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. भास्कर समूहातर्फे आयोजित संगणक प्रशिक्षण कार्यक्रमात असे अनेक जण सहभागी झाले आहेत.

१० राज्यांत ३४ शहरांत आयोजित करण्यात येत असलेल्या या संगणक प्रशिक्षण कार्यक्रमात आतापर्यंत ६,७०० पेक्षा जास्त नागरिकांनी संगणक प्रशिक्षण घेतले आहे. या वर्षी या उपक्रमात १२, ००० पेक्षा जास्त नागरिक, महिला ज्येष्ठ नागरिकांना संगणक प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी नागरिकांना ‘दिव्य मराठी'च्या कार्यालयांमधून वेगवेगळ्या बॅचेसमध्ये प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

डॉ. भंडारी यांनी सांगितले की, आजची २१ व्या शतकातील पिढी शाळांतच संगणक शिकून त्यात पारंगत होते. ज्येष्ठ नागरिकदेखील संगणक शिकू इच्छितात. भास्कर समूहाने त्यांना संगणक शिकण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. तीदेखील नि:शुल्क. डॉ. भंडारी यांच्याप्रमाणेच बहुतांश प्रशिक्षणार्थींनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी सांगिले आहे.

पप्पा, तुम्ही शिका; मी कॉम्प्युटर घेऊन देते
अनेकदा मनात आले की आपणही संगणक शिकला पाहिजे. परंतु संकोच वाटत होता. भास्कर समूहाच्या संगणक प्रशिक्षणाबाबत समजले तेव्हा लुधियानामध्ये नोकरी करणारा मुलगा दोहा येथील मुलीने मला संगणक घेण्यासाठी प्रवृत्त केले. मुलगी तर मला म्हणाली की, पप्पा तुम्ही शिका; मी तुम्हाला कॉम्प्युटर घेऊन देते.- प्यारेमोहन शरण, रांची
डॉ. सुखराज भंडारी

आता मी आत्मविश्वासाने कॉम्प्युटरवर काम करते
ऑनलाइन मार्केटची माहिती मिळाली. कोर्समधून सामान कसे खरेदी करावे, मॅटर कसे पाठवावे अशा छोट्या - छोट्या गोष्टी प्रशिक्षणातून समजल्या. पती सीए आहेत. त्यांच्या ऑफिस कामातही मदत करू शकते. मी आता विश्वासाने संगणकावर काम करू शकते. - नसीमबानो, बिकानेर

नव्या कामात संगणकाची मोठी मदत होत आहे
मी प्रॉपर्टी डीलरचे काम सुरू केले आहे. संगणक प्रशिक्षण घेतल्यामुळे या व्यवसायात मला त्याचा लाभ झाला आहे. प्लॉटबाबतचा डाटा एक्सेलमध्ये फीड करतो, फोटो टाकू शकतो. इतर माहिती नेटवरून मिळवतो. हे प्रशिक्षण मला खूप उपयोगी पडत आहे. - अरुणकुमार योगिपूर, पाटणा