आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोपाळ : तलावात सुरु होती पार्टी, नाव उलटल्याने पाच जणांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी रात्री 8 च्या सुमारास ही दुर्घटना झाली. - Divya Marathi
रविवारी रात्री 8 च्या सुमारास ही दुर्घटना झाली.
भोपाळ - येथील 'छोटा तालाब' मध्ये रविवारी रात्री नऊ मित्र पार्टी करत होते. चालत्या नावेत एक जण नाचायल लागला. तेव्हा नाव हेलकावे घेऊ लागली आणि काही क्षणात उलटली. बचाव पथकाने पाच तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांच्या माहितीनूसार काही जण दारु प्यायलेले होते. त्यांच्यातील एक जण आधी पोहोत किनाऱ्यावर आला मात्र, मित्राला वाचवण्यासाठी तो पुन्हा तलावात उतरला आणि बुडाला.

पोहता येत होते, मात्र नावेखाली अडकले
- या दुर्घटनेत बचावलेल्या मोनू बाथमने सांगितले, 'रविवारी सायंकाळी माझा मित्र बिट्टू मालवीय भोईपुऱ्यात आला होता. त्याच्यासोबत अजय, राज मालवीय, मनीष, अप्पू, सौरभ, शुभम आणि आरिफ होते, आम्ही सर्व पार्टी करण्यासाठी गेलो.'
- भोईपूऱ्यातून सर्वजण महावीर घाटावर गेले. एक नाव घेतली. तेव्हा खूप अंधार झालेला होत. नाव घेऊन छोटा तालाबमध्ये ते सर्वजण उतरले. नाव मोनू बाथमच चालवत होता, असे त्याने सांगितले.
- जवळपास एक तास सर्वजण नावेत होते. वातावरणही चांगले होते. त्यानंतर कमलापती घाटाकडे त्यांनी नाव नेली.
- मोनु म्हणाला, 'आम्ही सर्वजण खूप मस्ती करत होतो. त्यातच एक जण उठला आणि नावेत नाचू लागला. यामुळे संतुलन बिघडले आणि काहा कळायच्या आत नाव पलटली.'
- नावेत बसलेल्यांपैकी कोणीच एकमेकांना फारसे ओळखत नव्हते, असे मोनुने सांगितले. तो म्हणाला, कोही माझे मित्र होते, काही बिट्टूचे. आमच्यापैकी सर्वात चांगला पोहोणारा बिट्टूच होता.
- नाव पलटी झाल्यानंतर सगळे त्याखाली अडकले. त्यानतंतर खोलवर जाऊन नावेतून बाहेर आलो, असल्याचे मोनु म्हणाला.

मित्राला वाचवायला गेलालाही बुडाला
- मोनु म्हणाला, 'कसे-बसे आम्ही पाचजण जीव वाचवून किनाऱ्यावर पोहोचलो. मात्र राजला वाचवण्यासाठी गेलेला बिट्टू पुन्हा परत आला नाही. तो तिथेच बुडाला.'
- आम्ही फार घाबरलेले होतो. मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागलो. तेव्हा काही लोक आले, आम्ही त्यांना सांगितले आमचे पाच मित्र बुडाले. त्यांच्यातील कोणीतरी पोलिसांना कळवले. काही वेळानंतर शोध सुरु झाला.
- बचाव पथकाने आमच्या पाच मित्रांना बाहेर काढले, मात्र त्यांचा मृत्यू झालेला होता.
पुढील स्लाइडवर पाहा, घटनास्थळावरील दृष्य आणि शोकाकूल नातेवाईक
बातम्या आणखी आहेत...