आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळ गॅंगरेप प्रकरण: हसत पोलिस अधिक्षिका म्हणाल्या, सकाळपासून ऐकुन डोके दुखतंय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीआरपीच्या पोलिस अधिक्षिका अनिता मालवीय या हे प्रकरण ऐकून हसत होत्या. - Divya Marathi
जीआरपीच्या पोलिस अधिक्षिका अनिता मालवीय या हे प्रकरण ऐकून हसत होत्या.
भोपाळ- हबीबगंज येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, याची सुनवाई फास्ट ट्रँक कोर्टात करायला हवी. याप्रकरणी आतापर्यंत 5 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तर जीआरपीच्या पोलिस अधिक्षिका अनिता मालवीय हे प्रकरण ऐकून हसत होत्या. आपले हे ऐकून डोके दुखत असल्याचे त्या म्हणाल्या.
 
काय आहे प्रकरण?
भोपाळमध्‍ये कोचिंग क्‍लासहून परतणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थीनीसोबत 31 ऑक्‍टोबररोजी गँगरेप झाला होता. संध्‍याकाळी 7.30 च्‍या सुमारास ही घटना घडली. 4 नराधमांनी तब्‍बल 3 तास मुलीवर अत्‍याचार केला. मात्र जवळच असलेल्‍या पोलिस स्‍टेशनला याचा सुगावाही लागली नाही. शेवटी कसेबसे पीडित तरुणी रात्री 10 वाजता आरपीएफ ठाण्‍यामध्ये पोहोचली. तरीही रेल्‍वे पोलिसांनी काहीही केले नाही. बुधवारी सकाळी पिडीता आणि तिचे आई-वडील एमपीनगर पोलिस स्‍टेशनमध्‍ये गेले. मात्र तेथेही तक्रार नोंदवून घेण्‍यास पोलिसांनी नकार दिला. तक्रार नोंदवण्‍यासाठी पालक आरपीएफ, एमपी नगर पोलिस स्‍टेशनदरम्‍यान चकरा मारत राहिले. अखेर मोठ्या मुश्किलीनंतर हबीबगंज पोलिस स्‍टेशनमध्‍ये पीडितेची तक्रार नोंदवून घेण्‍यात आली. तोपर्यंत घटना घडून 24 तास उलटून गेले होते.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...