आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPS बनून सिस्टिम सुधारणार, कारण पुन्हा असे कुणाशीही होऊ नये: भोपाळ गँगरेप पीडिता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजधानीत 6 दिवसांपूर्वी गँगरेपची शिकार झालेल्या तरुणीला आयपीएस अधिकारी बनून समाज आणि सिस्टिमच्या दुष्प्रवृत्तींना संपवायचे आहे. पीडितेने सोमवारी DivyaMarathi.com ला म्हटले, मी जीवनाला पुन्हा एकदा संधी देऊ इच्छिते. आयपीएस अधिकारी बनून महिलांच्या होत असलेल्या शोषणाचा खात्मा करेन. जेणेकरून मी जे काही भोगले, ते दुसऱ्या कुणाशी होऊ नये.
- तथापि, गत 31 ऑक्टोबरला हबीबगंज रेल्वे स्टेशनजवळ 19 वर्षीय विद्यार्थिनीवर गँगरेप झाला होता. तेव्हा ती सिव्हिल सर्व्हिसेसच्या कोचिंग क्लासहून परतत होती. पोलिसांनी 24 तासांनंतर तक्रार नोंदवली. 3 आरोपींना अटक झालेली आहे, तर चौथा अजूनही फरार आहे.
 
पोलिसांचे मागचे पाढे पंचावन्न...
- पीडितेने म्हटले, "समाज आणि सिस्टिममध्ये मी सुधार आणू इच्छिते. कारण माझ्यावर जे काही गुदरले ते इतर कुणासोबतही होऊ नये. भारतीय पोलिस सेवेत दाखल होऊन महिलांविरुद्ध होत असलेल्या गुन्ह्यांचा खात्मा करायचा आहे. यासाठी मला जे काही करावे लागेल, ते मी करेन.
- अधिकारी बनून अगोदर समाज आणि सिस्टिममध्ये सुधार आणण्याचा प्रयत्न करेन. यामुळे क्राइम होताना तो पाहत राहण्याऐवजी लोक ते रोखायला समोर येतील. सोबत कित्येक वर्षे जुन्या पद्धतीवर काम करत असलेल्या पोलिस डिपार्टमेंटमध्येही बदल आणण्यासाठी प्रयत्न करेन. पोलिसांनी प्रत्येक वेळी अलर्ट राहण्याची गरज आहे."
 
एवढ्या प्रश्नांची उत्तर देऊन-देऊन थकले आहे: गँगरेप पीडिता
- पीडितेने रविवारी म्हटले होते की, चार दिवस झाले, मी आईवडिलांसह भटकत आहे. कधी जबाब देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये, तर कधी तपासणीसाठी हॉस्पिटल. पहिल्या दिवशी एफआयआर दाखल करण्यासाठी भटकले, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी दिवसभर पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. तिसऱ्या दिवशी मेडिकल आणि चौथ्या दिवशी सोनोग्राफीसाठी बोलावण्यात आले."
- प्रत्येक वेळी तेच प्रश्न आणि तीच जागा माझ्यासमोर नेहमी-नेहमी येत आहे. "काय झाले होते? कुठे झाले होते? कसे दिसत होते? काय बोलत होते?" प्रश्न एवढे की उत्तरे देता-देता गळ्यातून आवाज निघणे बंद होत होते. परंतु त्यांचे प्रश्न संपत नव्हते. सिस्टिम आणि पोलिसांबद्दलही मला राग येतोय."
- घटनेच्या दिवशी जीआरपी एसपी अनिता मालवीय महिला असूनही माझा विनोद करत होत्या. त्या माझे दु:ख ऐकून हसल्या, मग न्यायाची कुठली अपेक्षा ठेवू. त्या या पदावर तर सोडा, पोलिसांची वर्दी घालण्यालायकही नाहीत. माझ्या या लढाईत माझे आईवडील प्रत्येक पावलावर माझ्यासोबत आहेत. त्यांनी मला सावरले आणि आरोपींविरुद्ध लढण्याची हिंमत दिली.
 
अशा घटनांमध्ये सर्व आईवडिलांनी आधार द्यावा...
- पीडिता पुढे म्हणाली- "त्या नराधमांना बिलकुल दयामाया दाखवू नये. मी सोडा-सोडा म्हणून विनवणी करत होते, पण ते क्रूरपणे हसत होते. सर्व नराधमांना भरचौकात फाशी द्यायला पाहिजे. माझे एकच आवाहन आहे, या प्रकारच्या घटनेनंतर कुटुंबीयांनी पीडितेला आधार देत लढण्यासाठी बळ दिले पाहिजे. माझे आईवडील दोघेही पोलिसांत आहेत. जर आमच्यासोबत असे झाले, तर विचार करा बाकी लोकांचे काय होत असेल."
- जेव्हा एफआयआर नोंदवायला गेले तेव्हा हबीबगंज पोलिसांनी आमची थोडी मदत केली, पण एमपीनगर आणि जीआरपी पोलिसांनी कोणतीही मदत केली नाही. जेव्हा आम्ही आरोपींना पकडायला गेलो, तेव्हा तेथील लोकांनी आमच्यावर हल्ला केला होता, पण पप्पांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले."
 
तिघांना अटक, एक फरार
- गोलू ऊर्फ बिहारी (25), अमर ऊर्फ गुल्टू (25) आणि राजेश ऊर्फ चेतराम (50) यांना अटक करण्यात आली आहे. चौथा आरोपी रमेश ऊर्फ राजू अजूनही फरार आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...