आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: जेव्हा जिन्स घालून मोदी आणि सुट घालून सुषमा मंचावर आल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - डमी मोदीजी असे इकडून या... सुहासिनी तुम्ही दीपप्रज्वलनाच्या वेळी मंत्रोच्चार कराल. अरे बहनजी, असे नाही. ओह... जरा भराभरा चाला... अच्छा, माइकवर जो कोणी असेल, त्याने लक्ष द्यावे. दोघांचाही आवाज स्पष्ट येईल असे माइक सेट करा. उमा तुझाही आणि तुमचाही. बघा, उमाचा आवाज दबका येतो आहे...

जागतिक हिंदी संमेलनाच्या पूर्वसंध्येला चाललेल्या तयारीचे हे दूश्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी येथे उद््घाटक आहेत. त्यामुळे बुधवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज लाल परेड ग्राउंडवर दाखल झाल्या. राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह आधीपासूनच येथे हजर होते.

रामधारीसिंह दिनकर सभागृहात सुषमा यांनी उद्याच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम घेतली. व्यासपीठावर मोदीजीही होते. सुषमा आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व राज्यपाल रामनरेश यादवही. पण सगळेच डमी. कोण केव्हा उठणार, किती वेगाने मंचापर्यंत जाणार, प्रत्येक छोट्या-मोठ्या सूचना सुषमा देत होत्या. ‘दीपप्रज्वलनाच्या वेळी सरस्वतीगीत नव्हे, मंत्रोच्चार करा. माइक कोणी बंद केला..? अरे लक्ष द्या.. त्यांनी नाव पुकारताच तुम्ही चालायला लागा. यासाठी किती सेकंद लागतील ते मला पाहायचे आहे. अच्छा, तुम्ही तिघे मान्यवर आता मागे जा. तिकडून चालत या.’ सुषमा स्वराज प्रत्येक गोष्टीच्या नोंदी घेत होत्या. पंतप्रधानांसह पाहुण्यांना शाल पांघरण्यात किती वेळ जाईल इथपर्यंतच्या... गृह राज्यमंत्री रिजिजू यांचे स्वागत करताना परराष्ट्र सचिव खुर्च्यांच्या मागून जातील की पुढून.. तयारी सुरू असतानाच शिवराजसिंह लवाजम्यासह आत आले. व्यासपीठावर बसून सुषमा डमी शिवराजना उद्देशून म्हणतात, अरे शिवराजजी, माझे भाषण तर संपले तुम्ही उशिरा आलात.. या इथे बसा..'
तेवढ्यात प्रसिद्ध कवी अशोक चक्रधर आले आणि सुषमांच्या बाजूला बसले. रंगीत तालमीत त्यांची एंट्री येताच ते स्टेजवर दाखल झाले. हे डमी चक्रधर नव्हते, खरे होते. व्यासपीठावरील मोदीजींनी हनुवटीवर हात टेकवून अनेकदा मोदीजी इफेक्ट देण्याचा प्रयत्न केला. यादव झालेले महाशय डोळे खाली घालून बसून होते. टपाल तिकीट जारी करण्याची वेळ आली तेव्हा सुषमा यांनी सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडमच्या स्क्रिप्टमध्ये बदल केला. कपाळावर हात मारून म्हणाल्या, अरे माहिती व प्रसारण मंत्रालय नाही, टपाल व दूरसंचार मंत्रालय म्हणा..’ तब्बल दोन तास चालली मोदीजींची ही रंगीत तालीम.
पुढील स्लाईडवर बघा, कशी रंगली रंगीत तालीम... सादर झाले सांस्कृतिक कार्यक्रम....