आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार वर्षापुर्वीचे भोपाळ, तलाव, मशिदी आणि हिरव्‍या डोंगरांचे जगप्रसिद्ध शहर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - एक हजार वर्षापुर्वीपासून अस्‍तित्‍वात असलेले भोपाळ शहर, पराक्रमी भोज राजाने या शहरावर राज्‍य केले. नंतर अफगाणिस्तानहून दोस्त मोहम्मद खान आणि त्‍यांच्‍या कित्‍येक पिढ्यांनी या शहरावर सत्‍ता गाजवली. हजार वर्षानंतरही या शहराचे वैभव कायम आहे.
नोव्‍हेंबर 1956 मध्‍ये दिवाळीच्‍या दिवशी या शहराला मध्‍य प्रदेशची राजधानी घोषित करण्‍यात आले त्‍यासाठी जवाहरलाल नेहरू आग्रही होते. आशियातील सर्वात मोठे सरोवर म्हणून या शहराला ओळखले जाते. खरोखर समुद्राप्रमाणे हा शहराची विशालता आहे. हिरवाई, सुंदर तलाव आणि भव्य मशिदींनी हे शहर सजले आहे.

तलावांबरोबर, हिरव्‍यागार पर्वतरांगाही या शहराची ओळख सांगतात. कित्‍येक बाबीत या शहराने वेगळेपण जपले आहे. नवाब काळात पूर्ण 100 वर्षापर्यंत महिलांनीच या शहरावर राज्‍य केले आहे. भारतात असे दुसरे शहर नाही. मशिदींचे शहर म्‍हणूनही भोपाळची ओळख आहे. जगातील सर्वात मोठ्या मशिदींमध्‍ये एक असलेली ताजुल मशीद आणि सर्वात छोटी दोन शिडीची मशीदही येथेच आहे. राजधानीच्‍या रूपात हे शहर 59 वर्षाचे झाले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, भोपाळचे नयनरम्‍य फोटो..
बातम्या आणखी आहेत...