भोपाळ- भोपाळमध्ये राहणा-या लक्ष्मी यादव यांनी पंतप्रधान व राष्ट्रपतींसह मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. अपंग असलेल्या लक्ष्मी यादव या दोन्ही पायांवर निट चालूही शकत नाहीत. लक्ष्मी यांचे एलएलएम आणि एम.फिलपर्यंत शिक्षण झाले आहे. पात्र, असूनही त्या त्यांच्या परिस्थितीमुळे कुठे काम करू शकत नाहीत. या स्थितीला वैतागून लक्ष्मी यांनी हे पाऊल उचलले आहे.
काय लिहीले पत्रात..
- मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी यादव यांनी पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांना पत्र लिहीले आहे.
- लक्ष्मी यांनी पत्रात लिहीले की, "माझ्याकडे उच्चशिक्षणाच्या पदव्या आहेत. मी एम.फिल आणि एलएलएम केले आहे."
- "उच्चशिक्षीत असूनही मी घरच्यांसाठी ओझे आहे."
- "माझे जीवन आणि माझे शिक्षण याचा मला काहीही उपयोग नाही, त्यामुळे मला इच्छामरण मिळायला हवे."
- लक्ष्मी यांनी असेही लिहीले की, "अपंगांना मिळणारे आरक्षण आणि शासनाच्या योजनाही मला नोकरी देऊ शकल्या नाहीत. वारंवार प्रयत्न करूनही मी अपयशी ठरली आहे."