आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: या खास कारणांमुळे मिळाली या तृतीयपंथीला राहुल गांधींच्या कार्यक्रमात VIP एंट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - या तृतीयपंथींचे नाव आहे लक्ष्मीनारायण त्रिपाठी. महाराष्ट्रातील ठाणे लोकसभा मतदार संघातून लक्ष्मीला काँग्रेसचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. आज भोपाळ येथे काँग्रेसच्या 'महिला संवाद' कार्यक्रमात लक्ष्मीला विशेष निमंत्रण होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महिलांच्या काय समस्या आहेत आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय असले पाहिजे, हे त्यांनी महिलांकडून जाणून घेतले. या कार्यक्रमासाठी 'गे राइट अक्टॅव्हिस्ट ट्रांसजेंडर' लक्ष्मी देखील उपस्थित होती. यावेळी लक्ष्मीने तृतियपंथीयांच्या व्यथा काय असतात, त्यांच्याकडे बघण्याची समाजाची मानसिकता, त्यामुळे त्यांना किती त्रास होतो, कोणत्या कोणत्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लगाते याची माहिती दिली. तृतीयपंथीयांना शक्य नाही असे यश लक्ष्मीने संपादन कले आहे. त्यासाठी तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.
बिग बॉस सीजन-5 मध्येही लक्ष्मीचा सहभाग होता. एका कार्यक्रमात लक्ष्मीने तृतीयपंथीयांनाही समाजात समान अधिकार मिळाले पाहिजे. त्यांनाही शिक्षण, नोकरी, राजकारणात स्थान असले पाहिजे. तेव्हाच ते स्वतःला सिद्ध करु शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. स्वतःसह लाखो तृतीयपंथींच्या हक्काची लढाई लक्ष्मीने महाराष्ट्रात सुरु केली आहे.