आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५, १० रुपयांच्या बनावट नाण्यांचा नेपाळमधून पुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिवानी - सध्या १० रुपयांच्या नाण्यांवरून जी चर्चा सुरू अाहे, त्यात तथ्य असल्याचे दिसून अाले. देशभरात ५ अाणि १० रुपयांचे बनावट चलनी नाणे अाले असल्याची माहिती असून याबाबत दिल्लीमधील दाेन सख्ख्या भावांची टाेळी देशभरात सक्रिय अाहे. नेपाळमधील विराटनगरात ही बनावट नाणी तयार केली जातात, त्यानंतर ती भारतात अाणली जातात. विराटनगरमधून नाणी घेऊन अालेल्या तिघांना बिहारमधील अररिया पाेलिसांनी अटक केली, तेव्हा त्यांच्या कबुलीजबाबातून ही माहिती समजली. मात्र, या टाेळीच्या म्हाेरक्यापर्यंत पाेलिस अद्याप
पाेहाेचले नाहीत.

सिवानीतील व्यापारी रमेश वर्मा हे बिहारमध्ये अाणि बिहारलगत नेपाळ सीमेपर्यंत अनेक वर्षांपासून ट्रान्सपाेर्टचा व्यवसाय करतात. अचानक ते बेपत्ता झाले. मागच्या महिन्यात पाेलिसांनी राजकुमार सिंह, रूपेश सिंह, अजय झा यांना अटक केली त्या वेळी त्यांनी बनावट नाण्यांच्या प्रकरणातून रमेश वर्माची हत्या केल्याची कबुली दिली. इतकेच नव्हे, तर दिल्लीतील सुबीकार लुथरा ऊर्फ साेनू अाणि त्याचा भाऊ उपकार लुथरा ऊर्फ राज यांच्या इशाऱ्यानुसार कमिशनवर हे काम अाम्ही करताे, असेही सांगितले. नेपाळमधील विराटनगर येथे बनलेली नाणी घेऊन दरभंगा टाेल प्लाझामार्गे ते भारतात प्रवेश करत. यादरम्यान राज अाणि त्याचा भाऊ साेनू दाेघे अगाेदर रेकी करत. टाेळीतील उर्वरित लाेक बनावट नाणी घेऊन दिल्ली, राजस्थान अाणि हरियाणात प्रवेश करत, अशी कबुली अाराेपींनी दिली.

नेपाळमध्ये चार रुपयांत मिळते १० चे नाणे
बिहार पाेलिस सध्या या प्रकरणात स्पष्ट काही बाेलण्यास नकार देत अाहेत. नेपाळमधील १० रुपयांचे नाणे विकत घेण्यासाठी लुथराची टाेळी चार रुपयांपासून सुरुवात करत असायची अशी माहिती हाती अाली अाहे. या टाेळीतील लाेक किमान ५ लाखांचे नकली नाणे घेऊन जात. त्यानंतर ९० रुपयांत १० अाणि १० रुपयांचे १० नाणे अशा पद्धतीने साैदा ठरत हाेता. या टाेळीतील काही लाेक हिसार अाणि भिवानी जिल्ह्यात काम करत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...