आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Biotic,Chemical Attacking Defencing Suit Made By DRDO

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जैविक, रासायनिक हल्ल्यापासून वाचवणारा स्वदेशी सूट तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - संरक्षण संशोधन व विकास स्थापना (डीआरडीई) ग्वाल्हेरमध्ये एक स्वदेशी कव्हरऑल सूट तयार केला आहे. हा सूट आण्विक, रासायनिक आणि जैविक हल्ल्यापासून बचाव करू शकेल. लष्कराने अनेक दिवसांच्या कठोर चाचण्यांनंतर मंजुरी दिली आहे. आता त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. आतापर्यंत भारतीय जवानांसाठी अशा प्रकारचा सूट र्जमनीहून आयात करण्यात येत होता. भारताने विकसित केलेला हा पोशाख र्जमनीच्या सूटपेक्षा चारपट स्वस्त आहे.

डीआरडीईच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, लष्करी जवानांसाठी एनबीएस कव्हरऑल सूट मार्क -5 ची निर्मिती पूर्ण झाली आहे. या सूटची दिल्लीत चार ते पाच जवानांवर चाचणी घेण्यात आली. त्यात पहिल्या टप्प्यात काही किरकोळ दोष दिसून आले. ते दूर करून त्यांची नव्याने यशस्वी चाचणी घेण्यात आली. या सूटचे वजन 2.15 किलोग्रॅम इतके असून याआधी वापरात असलेल्या र्जमनीच्या सूटचे वजन 2.27 किलोग्रॅम इतके होते.


चार किलोचा सूट वापरात
पूर्वी लष्करी जवान जो स्वदेशी सूट वापरत होते, त्याचे वजन जवळपास चार किलोग्रॅम इतके होते. इतका जाड सूट घालून गस्त घालताना जवान थकून जात असत. तसेच त्याचा परिणाम जवानांच्या कामगिरीवर होत होता. त्यामुळे त्याचा वापर थांबवण्यात आला होता. त्यानंतर र्जमनीहून हलक्या वजनाचे सूट आयात करण्यात येऊ लागले. या सूटची प्रत्येकी किंमत जवळपास 32 हजार रुपये होती. डीआरडीईने त्यापेक्षा सरस दर्जाचा सूट केवळ आठ हजारांत तयार केला आहे.


रासायनिक हल्ला चाचणी
सिरियात नुकताच रासायनिक हल्ला झाला. त्यानंतर त्याच्या नमुन्यांची चाचणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या रासायनिक शस्त्रास्त्र निषेध संघटनेने (ओपीसीडब्ल्यू) डीआरडीईच्या प्रयोगशाळेत संपर्क केला आहे. सिरियातील हा हल्ला जागतिक महायुद्धानंतरचा सर्वात मोठा रासायनिक हल्ला समजला जात आहे. रासायनिक हल्ल्याचा या पोशाखावर होणारा परिणाम तपासला जाणार आहे.


आगीपासून बचाव करणारा सूट
स्वदेशी कव्हरऑल सूटमध्ये वापरण्यात आलेले कार्बन स्फीयर (एसीएस) डीआरडीईच्या ग्वाल्हेर शाखेत फ्लुडाइज्ड बीड रिअँक्टरद्वारे (एफबीआर) तयार केले आहे. या सूटवर पाणी व तेलाचा काहीच परिणाम होत नाही. तसेच त्यात अग्निरोधक गुणही उपलब्ध आहेत.


विदेशातूनही मागणीची शक्यता
पोशाखाची वैशिष्ट्ये : या सूटमध्ये दोन कपड्यांच्या आतील थरात सक्रिय स्फॅरिकल कार्बनचे कण भरलेले आहेत. कार्बनचे हे कण चिकटवण्यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान एकदम वेगळे आहे. ज्ॉकेट, पँट व चेहर्‍याची विशेष कॅप एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. हा सूट प्रतिकूल हवामानातही सैनिकांचा तब्बल 90 तासांपर्यंत बचाव करू शकतो. जास्तीत जास्त सहा वेळा धुऊन त्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो.


22 पैकी 14 देशांत डीआरडीआईच्या सँपलचे परीक्षण झाले नाही : रासायनिक शस्त्रास्त्र निषेध संघटनेने 32 वे अधिकृत कौशल्य परीक्षणासाठी डीआरडीआईला मूल्यांकन प्रयोगशाळा म्हणून नियुक्त केले होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2012 मध्ये डीआरडीआयच्या बरटॉक्स प्रयोगशाळेत 22 पैकी 18 देशांनी प्रयोगशाळांसाठी रासायनिक युद्धक अभिकारक व त्यांच्या मार्क्‍सची अतिसूक्ष्म प्रमाणातील ओळख व चिन्हांकने करण्यास आव्हान देण्यात आले होते. त्यात 14 देशांच्या प्रयोगशाळा यश मिळवू शकल्या नाहीत.