आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Celebration Of God Shiva\'s Son Kartikeya

PHOTO: श्रध्देच्या नावावर देतात शरीराला यातना, या जत्रेत येतो अंधश्रध्देला महापूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळः भगवान शंकराचे पुत्र कार्तिक स्वामी यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने सुरू असलेल्या यात्रेत अंधश्रध्देला उत आल्याचे दिसून येते. येथे श्रध्देच्या नावावर अत्यंत भयावह प्रदर्शन करणारा तमिळ समाज शारिरीक कष्ट द्यायला जरासुध्दा घाबरत नाही. तोंडाच्या आरपाल टोचलेला भाला, पाठीला आकडे टोचून रथाला ओढणे आणि लहान मुलींच्या अंगावरून हा रथ ओढणे अशी अंगावर काटा आणणारी दृश्य तुम्हाला येथे पाहायला मिळतील.या जन्मोत्सवास देशभरातील अनेक ठिकाणातून भावीक येत असतात. तसेच देशात जिथे जिथे तमिळ समाज आहे तेथे ते असा उत्सव साजरा करतात. मागितलेला नवस पुर्ण झाल्यानंतर ते वेगवेगळ्या पध्दतीने तो पुर्ण करतात.

भगवान कार्तिक स्वामीचा जन्मोत्सव
भोपाळच्या आदर्श तमिळ सोसायटीने नेहमीप्रमाणे यावेळीही भगवान कार्तिक स्वामींचा जन्मोत्सव साजरा केला. दर वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला कार्तिक स्वामींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या वेळी मोठी यात्रा निघते, यामध्ये नवस मागणारे भाविक त्यांच्या पाठीला रथाचा हुक टोचून भगवान कार्तिक स्वामीचा रथ ओढतात.

कोणतीही जखम होत नाही
तमीळ आदर्श सोसायटीचे माजी महासचिव डीएस मणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या यात्रेतून आम्ही भगवान कार्तिक यांच्याप्रति असलेली आमची श्रध्दा प्रकट करतो. तोंडाला भाला आरपार टोचून अथवा पाठीवर रथाचा हूक टोकूनसुध्दा त्या व्यक्तीला कसलीही जखम होत नाही. तसेच यातून रक्ताचा एक थेंबसुध्दा निघत नाही.

पुढील स्लाईडवर पाहा, या यात्रेचे इतर फोटो...
(नोट - पुढील फोटो तुमचे मन विचलीत करू शकतात.)