आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP President Amit Shaha Says Need 25 Years For Achchhe Din

\'अच्छे दिन\' पाच वर्षांत शक्य नाही, 25 वर्षे लागतील : अमित शहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांपूर्वी दाखवलेले 'अच्छे दिन'चे स्वप्न हे स्वप्नच असल्याचे आता जणू स्पष्टच झाले आहे. कारण अच्छे दिन पाच वर्षांत येऊ शकत नाही, त्यासाठी 25 वर्षे लागतील असे खुद्द भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. सोमवारी एका कार्यक्रमात त्यांनी हे खळबळजनक विधान केले. भारताला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी भाजपला या 25 वर्षांमध्ये ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक जिंकावी लागणार आहे, असे शहा म्हणाले.

भाजपच्या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते झाला. इंग्रजांच्या राजवटीपूर्वी भारताला जगभरात ज्याप्रमाणे सन्मान मिळत होता, तसाच सन्मान परत मिळवून देणे म्हणजेच अच्छे दिन असल्याचे, शहा म्हणाले. पहिल्या पाच वर्षांत भाजप महागाई कमी करू शकते, देशाच्या सीमा अधिक सुरक्षित बनवू शकते, आर्थिक विकासाचे धोरण ठरू शकते तसेच सशक्त परराष्ट्र धोरण तयार करू शकते. त्याचबरोबर नोकऱ्या देणे, गरीबी दूर करणे अशी कामे पहिल्या पाच वर्षात शक्य असल्याचे ते म्हणाले.

कातडी जाड झाली...
शहा यांनी मंत्री, खासदार आणि आमदारांना चांगलेच फैलावर घेतले. एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकल्याने नेत्यांची कातडी जाड झाली आहे. त्यांच्यात असलेल्या संवेदना क्षीण होत चालल्या आहे. संघटनेचे आचार विचार आणि कामातील त्यांचा रस कमी झाला आहे. अध्यक्षांनी यावे आणि भाषण देऊन निघून जावे असे त्यांना वाटते. पण मी चिपकू अध्यक्ष आहेत. माझे सहा ते सात लोक असे आहेत, जे काम करण्यासाठी तुमच्या मागे लागतील, असे ते म्हणाले. संघटनेबाबत निर्माण होणाऱ्या नाराजीबाबतही त्यांनी सल्ला दिला. ते म्हणाले की, नेहमी अशी भावना असायला हवी की, आमचेच सरकार चांगलेच आहे. घरातील मूल जरा मंद असेल तर त्याला बाहेर हकलले जात नाही.