आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Blast At Petlawad In Jhabua District Madhay Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेशात झाबुआच्या बसस्टँडजवळ स्फोट 82 ठार, 120 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाबुआ (मध्यप्रदेश) -झाबुआ येथील पेटलावदमध्ये झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर हॉटेलचे छत कोसळल्याने 82 जण ठार झाले तर, या दुर्घटनेत 120 लोक जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी 8.30 वाजता बस स्टँडजवळी एका हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली. स्फोटानंतर बराचवेळ मृतदेह रस्त्यावर पडलेले होते. ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने नागरिकांना मोठा त्रास झाला. ढिगारा उपसण्यासाठी चार जेसीबी मशिन बोलावण्यात आले.
केव्हा, कुठे आणि कशी झाली दुर्घटना
पेटलावाद बसस्टँड शेजारील एका घरात शनिवारी सकाळ 8.30 वाजता स्फोट झाला. या घराचा काही भाग एका फर्मला भाड्याने देण्यात आला होता. त्यांनी येथे डिटोनेटर्स, जिलेटीनच्या कांड्या आणि स्फोटके ठेवली होती. त्यांचा उपयोग मायनिंग आणि दगड फोडण्यासाठी केला जातो. यांना आग लागली आणि स्फोट झाला. या स्फोटामुळे शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये आग लागली आणि तेथील सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट एवढा मोठा होता की, 100 मीटर अंतरापर्यंतच्या इमारतींचे यामुळे नुकसान झाले. स्फोटातील जखमींना तातडीने रतलाम आणि इंदूरला नेण्यात आले. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक दबले असण्याची शक्यता आहे. इंदूरहून वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
स्फोटानंतर छत हवेत उडाले
स्फोटातून वाचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांचे मृतदेह हवेत असे उडाले जणू काही दगड फेकला आहे.
शेजारी असलेल्या स्फोटकांच्या दुकानातील जिलेटीनने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. स्फोटामुळे हॉटेलचे छत कोसळले. त्याखाली बरेच लोक दबले.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
अनेक जखमींची प्रकृत नाजूक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे राज्याचे गृहमंत्री बाबूलाल गौर म्हणाले. सरकार स्फोटाचा तपास करणार आहे त्यानंतरच ही घटना कशी घडली हे सांगता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.
पीडितांना मदतीची घोषणा
मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना उपचारांसाठी 50 हजार रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.

12 तासांत तीन मोठ्या दुर्घटना
शुक्रावारी रात्री 10 वाजतापासून सकाळी 10 वाजतापर्यंत तीन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यात 150 हून जास्त लोकांचे प्राण गेले.

>> पहिली दुर्घटना - शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान मक्का मशिदीवर क्रेन पडल्याने 107 जण दगावले. या दुर्घटनेत दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी सकाळी मिळाली.

>> दुसरी दुर्घटना - शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता आंध्र प्रदेशात दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे रुळावरुन घसरले. या दुर्घटनेत दोन जण ठार झाले.
>> तिसरी दुर्घटना - शनिवारी सकाळी 8.30 वाजता मध्येप्रदेशातील झाबुआ येथे सिलिंडरचा स्फोट झाला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित फोटो