आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यप्रदेशात भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये ब्लास्ट, 12 जखमी, बोगीला पडले भगदाड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ/भोपाळ - नोव्हेंबरमध्ये इंदूर- पाटणा एक्सप्रेसवर हल्ला केल्यानंतर मंगळवारी अतिरेक्यांनी भोपाळ- उज्जैन पॅसेंजरला लक्ष्य बनवले. उज्जैनला निघालेल्या या रेल्वेच्या जनरल डब्यात सकाळी एकापाठोपाठ एक असे दोन स्फोट झाले. त्यात १० जण जखमी झाले. लखनऊच्या ठाकूरगंजमध्ये संशयित अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेश एटीएसने एका घराला घेराव घातला. दुपारी संशयित अतिरेकी शस्त्रास्त्रांनी सज्ज होता. दोन्ही बाजूंनी बराच वेळ गोळीबार चालू होता. संशयित अतिरेक्याला जीवंत पकडण्यासाठी एटीएसने अश्रूधूर व मिर्ची बॉम्बचा वापर केला. या अतिरेक्याचा मध्य प्रदेशातील रेल्वे बॉम्बस्फोटात हात असल्याचा संशय आहे.  दरम्यान, या स्फोट प्रकरणी कानपूर व इटावा येथून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांची चौकशी सुरू आहे.

भीतीमुळे लोकांनी कोचमधून घेतल्या उड्या 
- प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ब्लास्टनंतर डब्यात गोंधळ उडाला. काही लोकांनी रेल्वेतून उड्या घेतल्या. त्यात काही ज्येष्ठांचाही समावेश होता. 
- स्फोटाचा आवाज येताच काही लोकांनी चेन ओढून रेल्वे थांबवली. 

ब्लास्ट का झाला, सांगितली जात आहेत तीन कारणे 
- या घटनेनंतर सर्वात आधी ब्लास्ट मोबाइल बॅटरीच्या स्फोटाने झाल्याचे समोर आले. 
- त्यानंतर या स्फोटाचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात आले. 
- नंतर आलेल्या वृत्तानुसार एका सुटकेसमध्ये ब्लास्ट झाला. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS....
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...