आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो रक्ताच्या थारोळ्यात वेदनेने विव्हळत होता, लोक बनवत होते व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- एक तरुण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तो वेदनेने विव्हळतही होता. पण कोणीही त्याच्या मदतीसाठी धावून आले नाही, लोक केवळ त्याचा व्हिडिओ बनवत होते. पोलिसांनीही केवळ गर्दीला नियंत्रित करण्याचे काम केले. फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही. अखेर पत्रकारांनी जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दारुच्या नशेत त्याने ब्लेडने कापली होती हाताची नस...
- ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील आहे. माधव चौकात बुधवारी सायंकाळी नशेत तर्रर्र झालेल्या एका तरुणाने ब्लेडने हाताची नस कापली. त्याने पोटावरही अनेक ब्लेडने वार केले होते. रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावर कोसळला.
- त्याच्या अंगात शर्टही नव्हता. तो रक्ताच्या थारोळ्यात वेदनेने विव्हळत होता. मदतीची याचना करत होता. मात्र, कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही.  
- रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक त्याला पाहात होते. पण, कोणीही फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावण्याची तसदी घेतली नाही. त्याऐवजी लोक मोबाइल कॅमेर्‍याने जखमी तरुणाचा व्हिडिओ बनवत होते. त्याचे फोटो क्लिक करत होते.
- धक्कादायक प्रकार म्हणजे पोलिस घटनास्थळी पोहोचले पण, तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्यांना गर्दी नियंत्रित करणे महत्त्वाचे वाटले.
- अखेर काही पत्रकारांनी अॅम्ब्युलन्स बोलवून जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये हलवले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... जखमी तरुणाचे फोटो

 
बातम्या आणखी आहेत...