भोपाळ - वार्ड क्रमांक 30 मधून विजयी झालेल्या काँग्रेसच्या तरुण उमेदवार सीमा सक्सेना विवाहापूर्वी अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांबरोबरच त्यांनी काही टिव्ही मालिकांमध्येही अभिनय केला आहे. त्यानंतर येथे महापालिकेची निवडणूक लढवून त्यात त्या विजयी झाल्या आहेत. 2011 मध्ये विवाह होण्यापूर्वी सीमा या 7 वर्ष बॉलीवूडशी संलग्न होत्या.
‘अ वेन्सडे’ आणि ‘चला मुसद्दी आफिस-ऑफिस’ या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सीमा यांनी 25 भोजपुरी आणि 2 तेलुगु चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या आहेत. त्यांच्या वार्डात त्यांच्या आधी त्यांचे पती प्रवीण सक्सेना हे नगरसेवक होते.
पती राजकारणात असल्याने सीमा या पूर्वीपासूनच रहिवाशांच्या समस्या ऐकायच्या आणि वार्डात सक्रिय होत्या. आरक्षणादरम्यान हा वार्ड महिलांसाठी
राखीव जाला. त्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. वार्डात विकासासाठी काय कामे करायची आहेत, याबाबत रहिवाशांबरोबर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यासाठी त्या वार्डात समित्या स्थापन करणार आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा सीमा यांच्या प्रचाराचे PHOTO...