भोपाळ/औबेदुल्लागंज (मध्य प्रदेश)- बुडत असलेल्या मैत्रिणीला वाचविण्यासाठी शुभम शुक्लाने नदीच्या पाण्यात उडी मारली. मैत्रिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात शुभमचा जीव गेला. फार्मसीचा विद्यार्थी शुभम चार मित्रांसोबत भोजपूरला गेला होता.
या चौघांपैकी अक्षतने सांगितले, की अंकूर दावडे शनिवारी रात्री इंदूर येथून भोपाळला आला होता. अंकूरने भोजपूर ट्रिपचा प्लॅन केला होता. सोमवारी सकाळी शुभम, अंकूर, राणी, किर्ती आणि अक्षत भोजपूरला आले. मंदिरात दर्शन घेतल्यावर पाच मित्रमैत्रिणी नदीच्या काठावर बसले होते.
राणी आणि किर्ती एमबीबीएसच्या विद्यार्थीनी
किर्ती आणि राणी एमबीबीएसच्या विद्यार्थीनी आहेत. हॉस्पिटलचे संचालक डॉ. डी. के. सतपथी यांनी सांगितले, की कॉलेज प्रशासनाची परवानगी न घेता दोघी भोजपूरला फिरायला गेल्या होत्या. या घटनेचा राणीला जबर धक्का बसला आहे. तिच्यावर मानसिक उपचार करण्यात येत आहेत. ती बैतुलची असून किर्ती राजस्थानची आहे.
शुभमचा मृतदेह मिळाला नाही
दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाणबुडे बोलविण्यात आले. त्यांनी दिवसभर शुभमचा शोध घेतला. पण त्याचा मृतदेह मिळाला नाही. या घटनेची माहिती मिळाल्यावर शुभमचे वडील नरेंद्र शुक्ला घटनास्थळी आले.
पाय घसरल्याने राणी नदीत पडली
पाचही मित्र नदीच्या काठावर बसले होते. तेव्हा राणीचा पाय घसरला. ती पाण्यात पडली. पाण्याचा प्रवाह जोरदार होता. तिला वाचविण्यासाठी शुभमने पाण्यात उडी मारली. पण दोघे वाहू लागले. हे बघून अक्षत, किर्ती आणि अंकूर यांनी मदतीसाठी इतरांना हाका मारल्या. यावेळी मंदिराच्या पुजाऱ्याच्या मुलगा कालूराम आणि त्याचे दोन मित्र परिसरात होते. ते मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी नदीच्या पाण्यात उड्या मारल्या. राणीला वाचविण्यात त्यांना यश आले. पण शुभम वाहून गेला.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....