आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boy In Live in relation Wanted To Marry With Another Girl

VIDEO: लिव्हइनमधील प्रेयसीला फसवून करणार होता लग्न, पोहोचला ठाण्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छतरपूर (मध्य प्रदेश)- लिव्हइनमधील प्रेयसीला न सांगता एक युवक लग्न करणार होता. पण याची माहिती मिळाल्यावर प्रेयसीने लग्न रोखले. युवकाला पोलिस ठाण्यात नेले. अखेर या युवकाने प्रेयसीला कोर्टमॅरेज करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रकरण निवळले. युवकाच्या भावाने नियोजित वधूशी लग्नमंडपात विवाह केला.
लिव्हइनमधील या युवकाचे नाव सोमिल रेकवार असून त्याच्यासोबत लिव्हइनमध्ये राहत असलेल्या प्रेयसीचे नाव क्रांती रेकवार आहे. दोघे वर्षभरापासून लिव्हइनमध्ये राहत होते. परंतु, तिला न सांगता सोमिल एका मुलीसोबत लग्न करणार होता. याची माहिती क्रांतीला मिळाली. तिने पोलिसांच्या मदतीने हे लग्न रोखले. सोमिलला पोलिस ठाण्यात नेले. पोलिस तक्रार दाखल करण्याची मागणी केली. यावेळी सोमिलने तिच्यासोबत कोर्टमॅरेज करण्याचे आश्वासन दिले.
सोमिलच्या घरी विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सोमिलच्या भावाने त्याच्या नियोजित वधूशी विवाह केला.
पुढील स्लाईडवर बघा, लिव्हइनमधील प्रेयसी क्रांती सोमिलला घेऊन गेली पोलिस ठाण्यात....दोघांनी दिली नात्याची माहिती...बघा व्हिडिओ आणि फोटोज...