आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात पहिल्‍यांदा डोक्‍यावर तयार केले नाक, डॉक्टरांनी 12 वर्षाच्‍या मुलाचे केले ऑपरेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- मध्यप्रदेशच्‍या इंदूरमध्‍ये डॉक्टरांच्‍या एका टीमने 12 वर्षाच्‍या मुलाच्‍या चक्‍क डोक्‍यावर नाक उगवले. देशाच्‍या मेडिकल हिस्‍ट्रीमध्‍ये पहिल्‍यांदाच अशी घटना घडली आहे. 12 वर्षीय मुलगा 3 महिन्‍याचा असताना त्‍याच्‍या नाकाच्‍या मासपेशी गळण्‍यास सुरूवात झाली होती.

- इंदूरचे डॉक्टर अश्विनी दास आणि त्‍यांच्‍या टीमने हे ऑपरेशन केले आहे.
- सुमारे एक वर्ष डॉक्‍टरांना हे ऑपरेशन करावे लागले.
- उज्जेनच्‍या खडेतिया येथील अरुण पटेल मताना गावात त्‍याच्‍या आजोबाकडे राहतो.
- तो तीन महिन्‍याचा असताना त्‍याच्‍या मासपेशी गळण्‍यास सुरूवात झाली होती.
- कुटुंबियांचे म्‍हणने आहे की, डॉक्‍टरांनी दिलेल्‍या एका इंजेक्शनमुळे असे झाले.
- "त्‍यानंतर अरुणचे नाक गळाले व त्‍याच्‍या चेह-याची ठेवणच विचित्र दिसत होती.
- "गावातील लोकांनी याला संसर्गजन्‍य आजार मानले. त्‍यानंतर अरुणचे घरातून बाहेर पडणेच बंद झाले. तो घाबरत होता."
- " अशा परिस्‍थितीत तो 12 वर्ष राहिला. गावातील एकाने त्‍याची प्‍लास्‍टिक सर्जरी केली होती. त्‍यानेच शहरात जाऊन उपचार घेण्‍याचा सल्‍ला दिला."
डॉक्टर काय म्‍हणाले..
- अरुणचे ऑपरेशन करणारे प्लास्टिक सर्जन डॉ. अश्विनी दास यांनी सांगितले की, रायनोप्लास्टी केल्‍या जाऊ शकत नव्‍हती.
- "या मुलाच्‍या चेह-यावर त्‍याच्‍या मासापासून बनलेले नाक ड्राफ्ट करण्‍याची प्रक्रिया काही महिन्‍यांपासून सुरू होती."
- "सिलिकॉन थैली डोक्‍यावर ठेवताना अशी भिती होती की, येथे इन्‍फेक्‍शन तर, होणार नाही किंवा नाक तिरपे तर होणार नाही."
- "मात्र, सर्व काही ठीक झाले आतापर्यंत सर्जरी यशस्‍वी राहिली आहे. आता आणखी या मुलाच्‍या 16 व्‍या वर्षात त्‍याची सर्जरी करावी लागणार आहे."
- "या ऑपरेशनसाठी पावणे दोन लाख रुपये खर्च आला."
असे लावले नाक..
पहिली स्टेज
- अरुणच्‍या डोक्‍यावर नाकासाठी जागा बनवून सिलिकॉनची थैली लावण्‍यात आली. या प्रोसेसव्‍दारे टिश्यू एक्सपेंशन करण्‍यात आले.
- तीन महिन्‍यांपर्यंत डोक्‍यावर सिलीकॉनची थैली लावलेली होती. या थैलीने नाकाचा आकार घेण्‍यास सुरूवात केली.
दूसरी स्टेज
- अरुणच्‍या छातीच्‍या खालील भागातून कार्टिलेज काढण्‍यात आली. त्‍याव्‍दारे त्‍याच्‍या चेह-याच्‍या आकारानुसार एक नाक तयार करण्‍यात आले. त्‍या नाकाला डोक्‍यावर बनवलेल्‍या जागेवर लावण्‍यात आले.
- तीन महिन्‍यापर्यंत नाकाला डोक्‍यावर ठेवण्‍यात आले. त्‍यानंतर शरीराच्‍या इतर अवयवांप्रमाणे नाक काम करू लागले.
तीसरी स्टेज
- तीन महिन्‍यानंतर डोक्‍यावरील कार्टिलेजचे नाक काढून नाकाच्‍या जागेवर लावण्‍यात आले.
- तेथे त्‍या नाकाला एका बारीक नसव्‍दारे जोडण्‍यात आले. त्‍याव्‍दारे रक्‍त पुरवठा सुरळीत होण्‍यास मदत झाली.

चीनमध्‍ये झाले होते असे ऑपरेशन..
- चीनमध्‍ये मागच्‍या वर्षी फेब्रुवारी महिन्‍यात डॉक्टरांनी असे ऑपरेशन केले होते.
- 24 वर्षीय जिओलिनचे नाक एका अपघातात कटले होते.
- फुजिआन स्टेटच्‍या फुझोऊ हॉस्पिटलमध्‍ये त्‍याचे ऑपरेशन करण्‍यात आले होते.
- डॉक्टरांनी जिओलिनच्‍या शरीरातून मास काढून डोक्‍यावर नाक बसवले होते.
- नंतर नाकाला चेह-यावर रिप्लेस करण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, ऑपरेशनच्‍या प्रक्रियेचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...