आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रेन हंट' ची गिनीज बुकात नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - दैनिक भास्कर समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ब्रेन हंट 2012 द क्वेस्ट फॉर वंडर किड्स’ला प्रतिष्ठेच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे.


सर्वात मोठी लेखन स्पर्धा म्हणून या उपक्रमाची नोंद झाली आहे. या स्पर्धेत 3,00,874 मुलांनी भाग घेतला होता. याआधी ‘ज्युनिअर एडिटर 2011’ या उपक्रमानेही जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. ‘ब्रेन हंट 2012’ चे आयोजन भास्कर चॅम्प क्लबच्या बॅनरखाली करण्यात आले होते. ही एक क्रिएटिव्ह आणि आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग कॉम्पिटेशन होती. याला इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान मिळाले होते. ही स्पर्धा देशातील 12 राज्यांत व 52 शहरांत आयोजित करण्यात आली होती. यात ड्रॉइंग, पेंटिंग, स्केचिंग याशिवाय निबंधलेखन, पत्रलेखन आदी 16 प्रकारांचा समावेश होता.