सरकारने आयोगाला दिले 15400 कोटी रुपये
- ओ.पी. रावत बुधवारी भोपाळमध्ये म्हणाले, एकत्र निवडणुका होण्यासाठी कोण-कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणते रिसोर्सेस लागतील याची विचारणा केंद्र सरकारने आयोगाकडे केली होती. आयोगाच्या मागणीनंतर गेल्या महिन्यात केंद्र सरकारने 15,400 कोटी रुपयांचा निधी आयोगाला दिला आहे.
40-40 लाख ईव्हीएम आणि व्हीव्हीपीटी मशिनची आवश्यकात
- रावत म्हणाले, दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी जवळपास 40-40 लाख ईव्हीएम मशिन आमि तेवढेच व्हीव्हीपीटी मशिनची आवश्यकता आहे. आयोगाने दोन कंपन्यांना हे काम दिले आहे.
- मध्यप्रदेशातील आगामी पोट निवडणुकीबद्दल त्यांना विचारण्यात आले त्यावर येत्या 6 महिन्यात या निवडणुका होतील असे रावत म्हणाले.
- गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभांच्या तारखांविषयी विचारले असता रावत म्हणाले, 'दोन्ही राज्यातील निवडणुकांची तयारी पूर्ण झाल्यानंतर तारखा घोषित केल्या जातील.'