आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bride And Groom Died When Truck And Car Dash Head on In Madhya Pradesh

पाठवणीनंतर भीषण अपघातात नवरदेव-नवरीचा दुर्दैवी मृत्यू, दोघांसह वऱ्हाडातले चौघे ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर- दोघांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती. अखेर लग्नघटका समिप आली. दोघांनी साता जन्माच्या आणाभाका घेतल्या. छान थाटामाटात लग्नसमारंभ पार पडला. सगळे सोपस्कर झाले. पण दोघांच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. जबलपूर येथून रिवाला परत येत असताना कारचा भीषण अपघात झाला. यात दोघेही, नवरदेव आणि नवरी मृत्युमुखी पडले. दोघांच्या आयुष्यात अगदी काही क्षणांचेच सांसारिक आयुष्य होते. दोघांचा मृत्यू जिवाला चटका लावून गेला. त्यांच्यासह एकूण चौघांचा या अपघातात मृत्यू झाला.
नवरदेव प्रदीप गुप्ता (वय 24), नवरी संवेदना गुप्ता (वय 22), नवरदेवाचा मोठा भाऊ राम गुप्ता (वय 26) आणि कार चालवत असलेले नवरदेवाचे काका कमल गुप्ता (वय 45) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. रामची पत्नी मयंका हिची प्रकृती गंभीर असून तिला जबलपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ओव्हरटेक करताना झाला अपघात
प्रवास सुरु असताना कारच्या समोर एक मॅजिक मिनिट्रक होता. त्याला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाला समोरुन येत असलेला ट्रक दिसला नाही. ट्रक आणि मारुती स्विफ्टची समोरसमोर टक्कर झाली. अपघात एवढा भीषण होता, की कार अगदी चक्काचुर झाली.
वडील झाले बेशुद्ध
नवरदेव-नवरीच्या कारचा अपघात झाल्याचे समजल्यावर संवेदनाचे वडील दिनेश गुप्ता, आई मृदुला गुप्ता, बहिण मोनिका आणि नातलग घटनास्थळी आले. यावेळी संवेदनाचा मृतदेह बघितल्यावर दिनेश बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा, भीषण अपघाताचा फोटो... जागीच ठार झाले नवरदेव-नवरी...