आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bride Groom Was Already Engaged With Another Girl

नवरदेवाचे आधीच झाले होते लग्न, मंडपात येऊन धडकली त्याची प्रेयसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सागर (मध्य प्रदेश)- मुख्यमंत्री कन्यादान योजने अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात एक विचित्र घटना घडली. नवरदेव नवरी सप्तपदी झाल्यावर मंडपाबाहेर आले. यावेळी नवरदेवाची प्रेयसी तेथे येऊन धडकली. तिने नवरदेवाच्या कानाखाली जोरदार वाजवली. त्यानंतर नवरदेवाने तिच्या कानाखाली मारली. हा संपूर्ण प्रकार बघून उपस्थित चक्रावून गेले. नवरदेवाच्या प्रेयसीने कोर्ट मॅरेजचे कागदपत्र दाखवल्यावर घडलेला प्रकार लोकांच्या लक्षात आला.
नवरदेवाच्या प्रेयसीने यावेळी दावा केला, की आमचे कोर्ट मॅरेज झाले आहे. तो धोका देऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न करीत आहे. या प्रसंगाने सगळे अगदी अवाक् झाले. काय करावे आणि काय करु नये, असे सर्वांना झाले. यावेळी नवरदेवाची प्रेयसी ऑटोत बसून निघून गेली. त्यानंतर नवरदेव आणि नवरी पोलिस ठाण्यात गेले. गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस पुढील तपास करीत आहे.
पुढील स्लाईडवर बघा, प्रेयसी समोर आल्यावर लग्नमंडपात कसा उडाला गोंधळ... बघा दोघांचे फोटो...