आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Brother In Law Married Mother In Law In Madhya Pradesh

PHOTOS: दिराने केले वहिनींसोबत लग्न, दुःखी चेहरे झाले आनंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडवा/इंदूर- एका वर्षापूर्वी वीजेचा धक्का लागल्याने मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. त्याचे लग्न झाले होते. त्याच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती. त्याच्या निधनाने घरातील कर्ता पुरुषच गेला. सोबत त्याला लहान मुलगाही होता. आता नातवाचे काय होणार असा प्रश्न घरातील आजींना पडला.
घरी विधवा सून, अविवाहित दीर आणि लहान नातू. तिघांच्या विचारांनी आजींना रात्र रात्र झोप लागत नव्हती. कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड पडली होती. त्यामुळे आजींच्या मनात विधवा सून आणि अविवाहित दिराचे लग्न करण्याचा विचार आला. त्यानंतर त्या दोघांशी बोलल्या. सुनेच्या वडीलांशी संपर्क साधला. अखेर सर्वांनी होकार दिला.
या आजीचे नाव शोभा गोहर असे आहे. त्या सांगतात, की माझा लहान मुलगा पदवीधर आहे. कपड्यांचा व्यवसाय करतो. समजुतदार आहे. त्याने लग्नाला होकार दिल्याने सगळे सुरळीत पार पडले. आम्ही लग्नसमारंभ आयोजित केला होता. वरात काढली. समाजाचे लोकही उत्साहाने सहभागी झाले. आता सगळे ठिक झाले आहे. आता माझा नातुही माझ्याजवळ राहू शकेल.
पुढील स्लाईडवर बघा, या लग्नाचे फोटो....