आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाची हत्या, वृत्त समजल्यावर छतावरुन पडली नवरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- बहिणीच्या लग्नाला एक दिवस शिल्लक असताना भावाची गळा कापून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नातलगांना पत्रिका देण्यासाठी भाऊ गेला होता. पण दिवसभर त्याचा काही पत्ता लागला नाही. रात्रीही तो घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या बंद मिलमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. याचे वृ्त्त समजल्यावर बहिण धावत निघाली आणि छातावरुन पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लक्ष्मणसिंह तोमर यांची मुलगी पूनमचा विवाह मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. त्याचे निमंत्रण देण्यासाठी छोटा भाऊ रवी सकाळीच घरुन निघाला. पण दिवसभर तो घरी परतला नाही. रात्रीही घरी आला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय घाबरले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना समाजले, की पोलिसांना घरापासून काहीच अंतरावर असलेल्या मिलमध्ये रवीचा मृतदेह सापडला आहे. त्याचा मृतदेहाजवळ दोन काठ्या सापडल्या. त्याच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केल्याचा खुणा होत्या.
मंगळवारी लग्न आयोजित करण्यात आल्याने ते रद्द करणे किंवा पुढे ढकलणे काही शक्य नव्हते. अखेर पूनमचा विवाह ठरल्याप्रमाणे लावण्यात आला. त्यानंतर रवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भावाच्या हत्येची वृत्त समजल्यावर बहिण पडली छतावरुन
घराच्या गच्चीवर मंडप घालण्यात आला होता. रात्री पूनम तेथेच झोपली होती. तिला रवीच्या हत्येचे वृत्त समजू नये याचा कुटुंबीयांनी प्रथम प्रयत्न केला. पण तिला हे वृत्त समजलेच. त्यानंतर ती लगेच पळू लागली. यातच ती छतावरुन खाली पडली. तिला खासगी रुग्णालयात भरती करावे लागले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पूनमच्या लग्नाच्या दिवशी रवीचा मृतदेह बघून आईवडीलांनी केला आक्रोष...