आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर भावावर आली पालकत्वाची जबाबदारी, ठेवले पत्नीसारखे संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित तरुणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना पोलिस. - Divya Marathi
पीडित तरुणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना पोलिस.
भोपाळ/हरदा - मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात भाऊ-बहिण या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर लहान बहिणीच्या पालकात्वाची जबाबदारी अविवाहित भावावर पडली तेव्हा त्याने तिच्यासोबत पती-पत्नीसारखे संबंध ठेवण्यास सुरुवात केली. या प्रकरणाचा खुलासा त्यांच्याच लहान बहिणीने केला आहे. बुधवारी पीडितेला हॉस्पिटलमध्येही वाईट वागणूक देण्यात आली. तिच्या वैद्यकीय तपासणीत हॉस्पिटल प्रशासनाने कमालीची दिरंगाई केली.
बऱ्याच वर्षांपासून सुरु होते लैंगिक शोषण, मारहाणही करायचा
- १७ वर्षांची पीडित मुलगी इतर तीन लहान बहिणींसोबत सावत्र भाऊ जितेंद्रसोबत (३५) राहात होत्या. त्यांच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न झालेले आहे.
- पीडितेच्या आई-वडिलांसोबत सावत्र आईचेही निधन झाले आहे. त्यामुळे सावत्र भाऊ जितेंद्र हाच चार सावत्र बहिणांचा पालक होता.
असा समोर आला भावाचा काळाचेहरा
- पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले, की आरोपीचे लग्न जुळत नव्हते. त्यामुळे तो त्रस्त होता.
- आरोपी बऱ्याच दिवसांपासून पीडित मुलीवर अत्याचार करीत होता. केवळ तिच्यासोबत दुष्कर्मच करीत नव्हात तर, तिला मारहाण देखील केली जात होती.
- मंगळवारी जेव्हा पीडितेच्या लहान बहिणीने त्यांना आपत्तीजनक स्थितीत पाहिले, तेव्हा भावाचा काळाचेहरा समोर आला.
- लहान बहिणीने पीडितेला धीर दिला आणि दोघी बहिणींनी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे निश्चित केले.
- सिराली पोलिस स्टेशनचे प्रमुख सुशील पटेल यांनी सांगितले, आरोपी जितेंद्र घरातून पळून गेला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
- अशीही माहिती आहे, की पीडितेना एकदा घरातून पळ काढला होता, मात्र ती परत अत्याचार करणाऱ्या भावाकडे का परत आली, याचाही पोलिस तपास करीत आहेत.

आमदार कन्या डॉ. नलिनी यांनी दिला होता नकार
- पीडित तरुणीला बुधवारी जिल्हा रुग्णालयात प्रशासकीय दिरंगाईचा सामना करावा लागला. यावेळी पोलिसांची मोठी धावपळ झाली.
- जिल्हा रुग्णालयातील महिला विभागाच्या डॉ. नलिनी दोगने यांनी हे प्रकरण दुसऱ्या पोलिस स्टेशनचे सांगत हद्दीचा वाद उपस्थित केला होता. आमच्या हद्दीतील ही घटना नसल्याचे सांगित डॉ. नलिनी यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला होता.
- हरदाचे आमदार डॉ. आर.के. दोगने यांच्या त्या कन्या असल्यामुळे कोणीही त्यांच्याशी वाद घालण्यास तयार नव्हते.
- पोलिस अधिकारी उमेश रघुवंशी यांनी सीएमओकडून परवानगीचे पत्र आणल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र या सर्व प्रक्रियेत तीन तास गेले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पीडितेचे मेडिकल करण्यास या डॉक्टरने दिला होता नकार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...